Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेटाच्या यंत्रणेला सापडले ५३ लाख धक्कादायक कंटेंट; ९८ टक्के प्रकरणे तक्रारीआधीच उघड, नेमकं काय घडलं?

ऑनलाइन बाल लैंगिक शोषणाविरोधात मेटाच्या सुरक्षा यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. जानेवारी ते जून २०२६ या काळात भारतात तब्बल ५३ लाख डिजिटल कंटेंटवर कारवाई करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे यातील ९८ टक्क्यांहून अधिक कंटेंट तक्रार येण्यापूर्वीच मेटाच्या यंत्रणेला सापडला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 08, 2026 | 04:41 PM
मेटाच्या यंत्रणेला सापडले ५३ लाख धक्कादायक कंटेंट; ९८ टक्के प्रकरणे तक्रारीआधीच उघड, नेमकं काय घडलं?

मेटाच्या यंत्रणेला सापडले ५३ लाख धक्कादायक कंटेंट; ९८ टक्के प्रकरणे तक्रारीआधीच उघड, नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • जानेवारी ते जून २०२६ दरम्यान भारतात ५३ लाख डिजिटल कंटेंट घटकांवर कारवाई
  • ९८ टक्क्यांहून अधिक कंटेंट तक्रार येण्यापूर्वीच शोधला
  • एआय टूल्स, लिंक ब्लॉकिंग आणि संशयास्पद वर्तनाच्या विश्लेषणावर भर
 

ऑनलाइन बाल लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी मेटाने आपल्या प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. जानेवारी ते जून २०२६ दरम्यान भारतात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील बाल लैंगिक शोषणाशी संबंधित ५३ लाख डिजिटल कंटेंट घटकांवर कारवाई करण्यात आली. यातील ९८ टक्क्यांहून अधिक कंटेंट कोणतीही तक्रार येण्यापूर्वीच शोधून काढण्यात आला.

एआयच्या मदतीने गैरप्रकार शोधण्यावर भर

ऑनलाइन बाल लैंगिक शोषण करणारे घटक तपास यंत्रणेला चकवा देण्यासाठी सातत्याने नवीन पद्धती वापरत असल्याने मेटाने आपल्या सिस्टीममध्ये अतिरिक्त एआय टूल्सचा समावेश केला आहे. वरवर निरुपद्रवी दिसणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मबाहेरील बेकायदेशीर कंटेंटकडे नेले जात असल्याचे प्रकार शोधण्यासाठी ही यंत्रणा वापरली जात आहे. मेटाच्या माहितीनुसार, अशा जाहिराती शोधून संबंधित अकाउंट्सवर कारवाई करण्यासोबतच त्यामधील बाह्य लिंक्सही ब्लॉक केल्या जात आहेत.

जाहिरातींची अधिक सखोल तपासणी

बाल लैंगिक शोषणाशी संबंधित संकेत असलेल्या जाहिराती शोधण्यासाठी नवीन लार्ज लँग्वेज मॉडेलवर आधारित डिटेक्शन सिस्टीम विकसित करण्यात आली आहे. जाहिरात नेमके काय दाखवते याबरोबरच ती वापरकर्त्याला कुठे घेऊन जाते, याचीही तपासणी केली जाते. तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पूर्वीच्या यंत्रणांच्या नजरेतून सुटलेला कंटेंट शोधण्यासाठी अतिरिक्त एआय तपासणी केली जात आहे. तसेच सुरक्षा यंत्रणांमधील त्रुटी शोधण्यासाठी ‘रेड-टीमिंग एआय एजंट’चा वापर केला जात आहे. अकाउंट हटवल्यानंतर पुन्हा नवीन अकाउंट तयार करून प्लॅटफॉर्मवर परतणाऱ्या वारंवार नियम मोडणाऱ्या घटकांना शोधण्यासाठीही यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे.

हेही वाचा: Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप

संशयास्पद वर्तनावरही लक्ष

मेटाच्या विविध एआय आणि ऑटोमेटेड टूल्सच्या माध्यमातून संशयास्पद अकाउंट्सचा शोध घेतला जातो. यामध्ये अकाउंटचे मेटाडेटा आणि वर्तनाशी संबंधित संकेतांचे विश्लेषण करणाऱ्या ‘बिहेव्हियरल सिग्नल्स’चा समावेश आहे. याशिवाय फोटो डीएनए आणि फोटो-व्हिडिओ मॅचिंग तंत्रज्ञानाद्वारे पूर्वी ओळखण्यात आलेल्या बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंटच्या प्रती शोधून काढल्या जातात. २०११ पासून मेटाच्या विविध अॅप्सवर या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे कंपनीने सांगितले.

बाह्य वेबसाइटच्या लिंक्सही ब्लॉक

बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंट होस्ट किंवा तयार करणाऱ्या बाह्य वेबसाइट्सच्या लिंक्स ब्लॉक करण्याची प्रक्रिया मेटाकडून राबवली जाते. एखादी लिंक ब्लॉक झाल्यानंतर तीच लिंक असलेले पोस्ट, जाहिरात किंवा कमेंटही शोधून हटवली जाते. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि थ्रेड्सवर अशा ब्लॉक केलेल्या लिंक्स असलेला कंटेंट पोस्ट करता येऊ नये, यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अशा लिंक्स असलेल्या जाहिराती अपलोड करतानाच नाकारल्या जातात.

सहा महिन्यांत जगभरात ३.३२ कोटी डिजिटल कंटेंटवर कारवाई

जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत जगभरात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील बाल लैंगिक शोषणाशी संबंधित ३३.२ दशलक्ष म्हणजेच ३.३२ कोटी डिजिटल कंटेंट घटकांवर कारवाई करण्यात आली. यापैकी ९७ टक्क्यांहून अधिक कंटेंट कोणतीही तक्रार येण्यापूर्वीच शोधून काढण्यात आला. याच कालावधीत भारतात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ५.३ दशलक्ष म्हणजेच ५३ लाख डिजिटल कंटेंट घटकांवर कारवाई करण्यात आली. यापैकी ९८ टक्क्यांहून अधिक कंटेंट तक्रार येण्यापूर्वीच शोधून त्यावर कारवाई करण्यात आली.

चौकट : आकडेवारीचा अर्थ

जगभरात : ३.३२ कोटी डिजिटल कंटेंटवर कारवाई
भारतामध्ये : ५३ लाख डिजिटल कंटेंटवर कारवाई

तक्रारीपूर्वी शोध :

  • जगभरात — ९७% पेक्षा अधिक
  • भारतात — ९८% पेक्षा अधिक
काय आहे ‘कंटेंटवर कारवाई’?
बाल लैंगिक शोषणाशी संबंधित आढळलेली पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा अन्य डिजिटल सामग्री हटवणे, ब्लॉक करणे किंवा त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे.

‘तक्रारीपूर्वी शोध’ म्हणजे काय?
वापरकर्त्याने तक्रार नोंदवण्यापूर्वी मेटाच्या स्वयंचलित सुरक्षा यंत्रणांनी संबंधित सामग्री ओळखणे.

कायदा अंमलबजावणी संस्थांसोबत समन्वय

बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मेटा कायदा अंमलबजावणी संस्थांसोबत काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे. मेटाने सप्टेंबरमध्ये बाल सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची माहिती इंडियन सायबरक्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या (I4C) माध्यमातून नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर देण्याची माहिती दिली होती. यामुळे बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंटची माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया अधिक मजबूत होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Web Title: Meta child sexual exploitation action india 53 million content 2026 sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • child
  • cyber crime
  • instagram
  • meta
  • Meta AI

संबंधित बातम्या

Facebook New Update: फेसबुकचा नवा अवतार; Home Feed हटणार, व्हिडिओला मिळणार पहिला नंबर
1

Facebook New Update: फेसबुकचा नवा अवतार; Home Feed हटणार, व्हिडिओला मिळणार पहिला नंबर

Instagram चा गेम बदलणार! MUSE AI एजंटमुळे युजर्सना मिळणार नवा अनुभव, नेमकं काय आहे अपडेट जाणून घ्या…
2

Instagram चा गेम बदलणार! MUSE AI एजंटमुळे युजर्सना मिळणार नवा अनुभव, नेमकं काय आहे अपडेट जाणून घ्या…

Nana Patekar यांचे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशी नेमके काय होते कनेक्शन? जाणून घ्या त्यांच्या डिजिटल आयुष्याबद्दल
3

Nana Patekar यांचे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशी नेमके काय होते कनेक्शन? जाणून घ्या त्यांच्या डिजिटल आयुष्याबद्दल

Cyber Crime : ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक फंडा; 6 बँकांमधील 43 खात्यांतले 2.12 कोटी ईडीने केले जप्त
4

Cyber Crime : ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक फंडा; 6 बँकांमधील 43 खात्यांतले 2.12 कोटी ईडीने केले जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.