
Congress META Protest
मुंबई : सोशल मीडिया अकाउंट निलंबित करण्याच्या मुद्द्यावरून मुंबईत राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात आवाज उठवणाऱ्यांची सोशल मीडिया खाती बंद केली जात असल्याचा आरोप करत मुंबई युवक काँग्रेसने थेट META कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. BKC येथील वर्ल्ड वनमधील META कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं पोस्टर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. (Mumbai News)
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. सोशल मीडियावर सरकारला प्रश्न विचारणाऱ्या आणि विरोधी विचार मांडणाऱ्यांचे अकाउंट निलंबित करून त्यांचा आवाज दडपला जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि राष्ट्रीय प्रभारी मनिष शर्मा यांची सोशल मीडिया खाती निलंबित करण्यात आल्याच्या घटनेचा विशेष निषेध करण्यात आला.
Mahayuti Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘META भाजपाचा बेटा’ अशा घोषणा देत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं पोस्टर जाळूनही निषेध व्यक्त करण्यात आला.
लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला सरकारला प्रश्न विचारण्याचा आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. सोशल मीडिया अकाउंट निलंबित करून हा अधिकार हिरावून घेण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असा इशारा झीनत शबरीन यांनी दिला.
या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे प्रभारी पवन मजीठिया, प्रदेश महासचिव अमनदीप सैनी, उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष निखिल रुपारेल, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अब्दुल समद आणि उत्तर पूर्व जिल्हाध्यक्ष शेखर जगताप सहभागी झाले होते.
याशिवाय विधानसभा अध्यक्ष विकास जयस्वाल, आशिष सरोज, राहुल पेडणेकर, शिवेंद्र घोरपडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
दरम्यान, लोकशाहीवादी आवाज दडपण्याच्या कोणत्याही प्रयत्नाविरोधात युवक काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असं झीनत शबरीन यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सोशल मीडिया अकाउंट निलंबनाचा मुद्दा आता मुंबईतील राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
Ans: मुंबईतील BKC परिसरातील वर्ल्ड वन इमारतीमधील META कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं.
Ans: भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि राष्ट्रीय प्रभारी मनिष शर्मा यांची सोशल मीडिया खाती निलंबित केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. विरोधी विचारांचा आवाज दडपला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
Ans: मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. यावेळी अश्विनी वैष्णव यांचं पोस्टर जाळून घोषणाबाजी करण्यात आली.