crime (फोटो सौजन्य: social media)
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. एक १६ वर्षाच्या मुलाने थेट डोंगरावरून उडी मारत आपला आयुष्य संपवलं आहे. त्यांना एका क्षुल्लक कारणावरून हे टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. शहारा जवळील खवड्या डोंगरावरून १६ वर्षीय तरुणाने उडी मारल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. आईने मोबाईल का दिला नाही ? या कारणाने त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.
Dharashiv Crime: धाराशिवमध्ये तुफान राडा; 25 ते 30 जणांच्या जमावाचा दोघांवर प्राणघातक हल्ला
नेमकं काय घडलं?
एका १६ वर्षीय मुलाने थेट डोंगरावरून उडी मारत आपलं आयुष्य संपवलं आहे. “आईने मोबाईल का दिला नाही?” या क्षुल्लक कारणावरून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शराजवळील खवड्या डोंगरावर ही घटना घडली आहे. मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असलेला हा मुलगा आपला आई- वडिलांसोबत वाळूज परिसरात राहत होता. तो सध्या पोलीस भरतीसाठी तयारी करत होता. काही दिवसांपूर्वी त्यांने आपल्या आई- वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र आईने “सध्या मोबाईल घेऊ नको” असं स्पष्ट सांगितल्याने तो नाराज झाला. आईने मोबाईल न दिल्याच्या रागात त्याने थेट खवड्या डोंगरावरून उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सुरु आहे.
पोलीस उपायुक्तांनी अपील
याप्रकारनंतर पोलीस उपयुक्त प्रशांत स्वामी यांनी अपील केलं आहे की, पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणं गरजेचं आहे. “मुलांमध्ये आलेली अस्थिरता, निर्णय घेण्याची घाई आणि तात्कालिक रागाचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. पालकांनी संवाद वाढवावा, मुलांच्या भावना समजून घ्याव्यात,” असं ते म्हणाले.
मानसोपचार तज्ञ काय सांगतात?
मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांचेही मत अधिक गंभीर आहे. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून मोबाईलचे आकर्षण इतकं प्रचंड वाढलं आहे की, मानसोपचार विभागात येणाऱ्या दहा केसेसपैकी नऊ केसेस या मोबाईलशी संबंधित असतात. मोबाईल मिळत नाही म्हणून मुले नैराश्यात जातात, चिडचिड करतात आणि काही वेळा जीवघेणं पाऊल उचलतात.”
डॉ. शिसोदे पुढे सांगतात, ..मुलांना या वयात राग अनावर होतो, आजूबाजूला सगळ्यांकडे मोबाईल आहे मग माझ्याकडे का नाही माझे पालक मला का देत नाही असा विचार त्याच्या मनात येतो आणि त्यातून ते असले धोकादायक निर्णय घेऊ शकतात त्यामुळे पालकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे .“या वयात मुलांमध्ये राग अनावर होतो. त्यांना वाटतं, ‘सगळ्यांकडे मोबाईल आहे, मग माझ्याकडे का नाही?’ या असंतोषातून त्यांचं विचार करणं बंद होतं आणि ते धोकादायक निर्णय घेतात. म्हणूनच पालकांनी कठोरपणा न दाखवता संवादातून मार्ग शोधावा.”