crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नेमकं काय आहे प्रकरण?
छत्तीसगडमधील एका छोट्याश्या गावात विनय वर्मा नावाचा २० वर्षीय युवक राहत होता. विनय वर्मा हा आयटीआयमधून इलेक्ट्रिशियनमध्ये डिप्लोमा करत होता. त्याच गावात राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडलं. मात्र त्या मुलीचा विनयवर प्रेम नव्हतं. तिला त्याच्या भावनांबद्दल काही देणंघेणं नव्हतं. काही महिन्यांपूर्वी त्या मुलीचे लग्न अफसर खान नावाच्या माणसाशी झाले. ही बाब विनयला माहिती झाली. त्याच तिच्यावरच प्रेम कमी होण्या ऐवजी त्याच प्रेम आणि तिचा ध्यास वाढत गेला. त्याला वाटले की जर त्याने अफसर खानचा काटा काढला तर कदाचित त्याला प्रेम मिळेल. त्याने त्याच्या मनात एक भयानक कट रचला.
इंटरनेटवर बघून बॉम्ब बनवला
विनयने तरुणीच्या पतीचा काटा काढण्याचा कट रचला. त्याने इंटरनेटवर बॉम्ब बनवण्याची पद्धत शिकली. तो रात्रंदिवस ऑनलाइन व्हिडिओ पाहत असे, पुस्तके वाचत असे आणि हळूहळू 2 किलोचा धोकादायक बॉम्ब तयार करू लागला. त्याला वाटले की हा बॉम्ब इतका शक्तिशाली असेल की त्याचे काम सहज होईल. अखेर त्याने तो बॉम्ब एका स्पीकरमध्ये लपवून ठेवला आणि तो एका पॅकेटमध्ये पॅक केला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने पॅकेटवर इंडिया पोस्टचा बनावट स्टॅम्प लावला. त्यानंतर त्याने हे पॅकेट 15 ऑगस्ट रोजी अधिकाऱ्याच्या दुकानात पाठवले.
गिफ्ट मध्ये निघाला बॉम्ब
जेव्हा त्या तरूणीच्या पतीला हे पॅकेट मिळालं तेव्हा त्याला वाटलं की हे लग्नाचं एखादं गिफ्च आहे, पण पॅकेटचं वजन जरा जास्तच होतं. तेवढ्यात त्याला त्याच्या पत्नीचं बोलणं आठवलं, तिने त्याला बरेच वेळा सांगितलं होतं की विनय तिच्याकडे विचित्र नजरेने पहायचा, तिचा पाठलाग करायचा. पत्नीने असेही बजावले होते की विनय काहीतरी वाईट करू शकतो. त्यामुळे ते आठवताच तिच्या पतीने विलंब न करता पोलिसांना बोलावले. पोलिसांनी पॅकेट उघडताच सर्वांना धक्का बसला. स्पीकरमध्ये 2 किलोचा IED (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) होता. जर कोणी तो चालू केला असता तर नको ते घडू शकलं असतं.
आरोपींना अटक
हे समोर येताच पोलिसांनी ताबडतोब तपास सुरू केला. त्या तरूणीच्या तक्रारीवरून पोलिस विनयपर्यंत पोहोचले. विनयच्या मोबाईलमध्ये बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि इंटरनेट हिस्ट्रीमध्येही तीच माहिती सापडली. त्याच्या घरातून स्फोटक साहित्य देखील जप्त करण्यात आले. विनयला खात्री होती की त्याचा कट कोणीही उघड करू शकणार नाही, पण तो चुकला. पोलिसांनी त्याला आणि या कटात सहभागी असलेल्या त्याच्या सहा साथीदारांना अटक केली. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल.
Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…