Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara crime: दारूच्या नशेत रिक्षाचालकाचे भयानक कृत्य! आधी २-३ वाहनांना दिली धडक, नंतर महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं

साताऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत असलेल्या बेभान झालेल्या रिक्षाचालकाने आधी अनेक वाहनांना धडक दिली त्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबलला रिक्षातून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 19, 2025 | 02:23 PM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

साताऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत असलेल्या बेभान झालेल्या रिक्षाचालकाने आधी अनेक वाहनांना धडक दिली त्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबलला रिक्षातून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवळपास २०० मीटर फरफटत नेलं. हा धक्कादायक प्रकार दुकानांमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सातारा पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

नेमकं काय घडलं?

सोमवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास खंडोबाचा मॉल परिसरात एका रिक्षाचालकाने भरधाव वेगात गाडी चालवत २-३ वाहनांना धडक दिली. धडक दिल्यानंतर देखील तो थांबला नाही. या घट्नेची माहिती वाहतूक शाखेत तैनात असलेल्या महिला पोलीस अधिकारी भाग्यश्री जाधव यांना कळवण्यात आली. त्यांनी तात्काळ जबाबदारी स्वीकारली आणि रिक्षा थांबवण्यासाठी चौकात त्या उभ्या राहिल्या.

मात्र रिक्षा चालक थांबला नाही. महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी रिक्षाचा पाठलाग करत या रिक्षा चालकाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षाचालकाने कॉलर पकडत हिसका देऊन त्यांना खाली पाडलं. मात्र त्यामुळे त्या महिला कॉन्स्टेबल पोलिसाच्या रेनकोट रिक्षाचा मागील अँगल मध्ये अडकला आणि तिला रस्त्यावर ओढली गेली. किमान २०० मीटर हुन अधिक ती फरफटत गेल्याची धक्कादायक घटना घडली. हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोक रस्त्यावर ओरडू लागले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका तरुणाने धाडस दाखवले. त्याने धावत जाऊन रिक्षाचे हँडल धरले आणि पूर्ण ताकदीने ते थांबवले, तेव्हाच महिला पोलिस अधिकाऱ्याची सुटका झाली. हा संपूर्ण थरार साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच खंडोबाचा माळ येथून मनाली कॉर्नर पर्यंत असणाऱ्या दुकानांमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

महिला कॉन्स्टेबल जखमी

या घटनेत महिला पोलीस यांना हाताला आणि डोक्याला दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताला जबाबदार असणाऱ्या रिक्षाचालकाला नरगरिकांकांनी पकडून चोप दिला आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे. सध्या आरोपीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Pune News: सिमेंट मिक्सरच्या खाली चिरडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, तर तिची आई गंभीर जखमी; घटना सीसीटीव्ही मधून कैद

Web Title: Satara crime horrific act of drunk rickshaw driver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 02:23 PM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Accident

संबंधित बातम्या

Pune News: सिमेंट मिक्सरच्या खाली चिरडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, तर तिची आई गंभीर जखमी; घटना सीसीटीव्हीमध्ये  कैद
1

Pune News: सिमेंट मिक्सरच्या खाली चिरडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, तर तिची आई गंभीर जखमी; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Beed Crime News : पती- पत्नीच्या सततच्या वादामुळे आईने दोन वर्षीय चिमुकलीसह संपवले आयुष्य; बीड मधील घटना
2

Beed Crime News : पती- पत्नीच्या सततच्या वादामुळे आईने दोन वर्षीय चिमुकलीसह संपवले आयुष्य; बीड मधील घटना

Chhatrapati Sambhajinagar लग्नाला नकार देताच प्रेयसीने काढला काटा, आधी प्रियकराला दारू पाजली नंतर गळ्यावरून…
3

Chhatrapati Sambhajinagar लग्नाला नकार देताच प्रेयसीने काढला काटा, आधी प्रियकराला दारू पाजली नंतर गळ्यावरून…

राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु; परळीत नदीपात्रात कारसह चौघे वाहून गेले, एकाचा मृत्यू
4

राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु; परळीत नदीपात्रात कारसह चौघे वाहून गेले, एकाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.