संभाजीनगरमध्ये ग्रामसेविकेवर अत्याचार; विविध ठिकाणी नेत अश्लील व्हिडिओ, फोटही काढले
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना मुंबईत बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. मुलुंडमध्ये एका 50 वर्षीय व्यक्तीने त्याच्याच 15 वर्षीय सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या अत्याचार प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
नराधम बाप 2020 पासून आपल्या मुलीसोबत दुष्कृत्य करत असल्याचे समोर आले आहे. पण, जेव्हा नराधम बाप हा त्यांच्या घरात पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करत असताना महिलेला आढळले. त्यानंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम बापाला बेड्या ठोकल्या. पीडितेच्या आईने शुक्रवारी मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेदेखील वाचा : Hotel Bhagyashree News: खळबळजनक! ‘हॉटेल भाग्यश्री’ च्या मालकाचे अपहरण करून बेदम मारहाण; मालकाने सांगितली आपबिती
दरम्यान, फिर्यादी महिला 2011 मध्ये पहिल्या पतीपासून विभक्त होऊन ठाण्यात राहत होती. उदरनिर्वाहासाठी ती एका कंपनीत काम करून लागली. 2013 मध्ये ती ठाण्यात आरोपीला भेटली आणि ते दोघे चांगले मित्र झाले. आरोपीही विवाहित होता. मात्र, तो पत्नीपासून विभक्त राहत होता. त्यामुळे या दोघांमध्ये प्रेमसंबंध आणखीन वाढून त्यांनी 2014 मध्ये लग्न केले.
लॉकडाऊनपासून सुरु केला छळ
2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान फिर्यादी महिला आणि तिचा दुसरा पती म्हणजे आरोपी आणि मुली खोपोली येथे तिच्या मूळ गावी गेल्या होत्या. जेव्हा तिला पहिल्यांदा लक्षात आले होते. पती तिच्या मोठ्या मुलीसोबत गैरवर्तन करत असल्याचा तिला संशय होता. त्यामुळे तिने तसं न करण्याबाबत आरोपीला ताकीदही दिली होती. मात्र, त्याच्या वागण्यात फरक जाणवला नाही. गेल्या आठवड्यात पुन्हा तिच्या मुलीसोबत गैरवर्तन झाल्याचे लक्षात आले. जेव्हा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, तेव्हा फिर्यादी महिलेने पोलिसांत जाऊन तक्रार देण्याचा निर्णय घेतला. याच तक्रारीवरून नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.