Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Love Affair Crime: प्रेम की वेड? १५ वर्षीय प्रेयसीच्या घरदारावर प्रियकराचा रक्तरंजित हल्ला; आई ठार!

Love Affair Crime: अवघ्या १५ वर्षांच्या मुलीचं प्रेम... पण घरच्यांचा विरोध! या विरोधाचा बदला घेण्याासाठी प्रियकराने क्रूरतेची सीमा ओलांडली. शस्त्र घेऊन घरात घुसला, आईला जागीच ठार केलं, वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आणि प्रेयसीसह तिच्या बहिणीचं अपहरण केलं!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 29, 2026 | 05:02 PM
Love Affair Crime: प्रेम की वेड? १५ वर्षीय प्रेयसीच्या घरदारावर प्रियकराचा रक्तरंजित हल्ला; आई ठार!

Love Affair Crime: प्रेम की वेड? १५ वर्षीय प्रेयसीच्या घरदारावर प्रियकराचा रक्तरंजित हल्ला; आई ठार!

Follow Us
Follow Us:
  •  प्रेमसंबंधास विरोध केल्याने प्रियकराने आईला संपवले व वडिलांना केले जखमी
  • आरोपीने प्रेयसी व तिच्या बहिणीचे  केले अपहरण
  • पोलिसांनी दोन्ही मुलींची सुटका केली; मात्र आरोपी अजूनही फरार
Love Affair Crime: तरुण वयात प्रेमाचे आकर्षण अनेकदा गंभीर गुन्ह्यांना आमंत्रण देते, याची प्रचीती देणारी एक थरारक आणि अत्यंत धक्कादायक घटना तामिळनाडूच्या थुथुकडी जिल्ह्यातून समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या प्रेमसंबंधातून घडलेल्या या रक्तरंजित नाटकात तिच्या आईला आपला जीव गमवावा लागला आहे, तर वडील मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तामिळनाडू हादरून गेले आहे.

विरोधामुळे संतापलेला प्रियकर शस्त्रासह घरात घुसला

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानप्रकाश याचे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. मुलगी अल्पवयीन असल्याने आणि त्यांच्या भविष्याचा विचार करून तिच्या पालकांनी या नात्याला कडाडून विरोध केला होता. घरच्यांच्या समजावणीनंतर मुलीने आरोपी ज्ञानप्रकाशसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले होते. आपली प्रेयसी दुरावल्याने आणि तिच्या घरच्यांकडून होत असलेल्या विरोधामुळे ज्ञानप्रकाश प्रचंड संतापला होता. याच रागातून त्याने अत्यंत क्रूर पाऊल उचलले. हातात धारदार शस्त्र घेऊन तो थेट मुलीच्या घरात घुसला. घरात शिरताच त्याने काहीही विचार न करता थेट मुलीच्या पालकांवर हल्ला चढवला.

हेही वाचा: Food Poisoning Case: एका चुकीने ओढावले ७ बालकांवर मोठे संकट! ‘ती’ गोष्ट खाल्ली अन् सुटला पालकांचा थरकाप!

आईचा जागीच अंत, वडिलांची प्रकृती गंभीर

आरोपीने केलेल्या या अचानक आणि भीषण हल्ल्यात मुलीची आई, मेरी रेगिला, यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून घरात एकच खळबळ उडाली. आरोपीने मुलीचे वडील, मुथुकृष्णन, यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

क्रूरतेची सीमा ओलांडली; दोन मुलींचे अपहरण

आई-वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाडल्यानंतरही आरोपीचा राग शांत झाला नाही. त्याने क्रूरतेची सीमा ओलांडत घरात असलेल्या दोन्ही मुलींना (त्याची प्रेयसी आणि तिची बहीण) जबरदस्तीने पकडले आणि घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीत कोंबले. दोन्ही मुलींचे अपहरण करून तो घटनास्थळावरून फरार झाला.

हेही वाचा: Accident News Pune: डंपरच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी अंत! तळेगाव एमआयडीसीत ग्रामस्थांचा चक्का जाम

पोलिसांची तत्परता, मुली सुखरूप; पण ‘तो’ फरार

या थरारक घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी नाकाबंदी केली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. पोलिसांच्या पथकाने अत्यंत वेगाने कारवाई करत अपहरण केलेल्या दोन्ही मुलींची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन निष्पापांचे अपहरण करणारा आणि एका महिलेची निर्घृण हत्या करणारा मुख्य आरोपी ज्ञानप्रकाश अद्याप फरार आहे. पोलीस त्याचे धागेदोरे शोधत असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तामिळनाडूच्या थुथुकडी जिल्ह्यातील हत्येची घटना नेमकी काय आहे?

    Ans: थुथुकडी येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याने, तिच्या प्रियकराने (ज्ञानप्रकाश) मुलीच्या आईची हत्या केली, वडिलांवर प्राणघातक हल्ला केला आणि प्रेयसीसह तिच्या बहिणीचे अपहरण केले.

  • Que: आरोपीने मुलीच्या आई-वडिलांवर हल्ला का केला?

    Ans: मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या घरच्यांनी तिच्या ज्ञानप्रकाशसोबतच्या नात्याला विरोध केला होता आणि मुलीने त्याच्याशी संबंध तोडले होते, याच रागातून आरोपीने हा हल्ला केला.

  • Que: सध्या मुलींची आणि आरोपीची स्थिती काय आहे?

    Ans: पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही अपहरण केलेल्या मुलींची सुखरूप सुटका केली आहे; मात्र मुख्य आरोपी ज्ञानप्रकाश अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Minor girl love affair leads to mother murder father injured and kidnapping sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • a minor girl
  • Crime . Crime News
  • killing news
  • love news

संबंधित बातम्या

Amgaon Murder Case: माजी प्राध्यापकाची विटांनी ठेचून निर्घृण हत्या! बोथली शेतशिवारातील घटनेने गोंदिया हादरले…
1

Amgaon Murder Case: माजी प्राध्यापकाची विटांनी ठेचून निर्घृण हत्या! बोथली शेतशिवारातील घटनेने गोंदिया हादरले…

Crime News Mumbai: तीन मुलांची आई, जुना प्रियकर अन् मुंबईतील फसवणूक! नाल्यात सापडलेल्या मृतदेहाने उघड केली खळबळजनक कहाणी
2

Crime News Mumbai: तीन मुलांची आई, जुना प्रियकर अन् मुंबईतील फसवणूक! नाल्यात सापडलेल्या मृतदेहाने उघड केली खळबळजनक कहाणी

Pune High Profile Case: पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा! छापा टाकताच अधिकारीही चक्रावले
3

Pune High Profile Case: पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा! छापा टाकताच अधिकारीही चक्रावले

Dhule Accident News: धुळ्यात दुर्दैवी घटना! सहामाही परीक्षा संपताच नदीत पोहायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
4

Dhule Accident News: धुळ्यात दुर्दैवी घटना! सहामाही परीक्षा संपताच नदीत पोहायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.