
Crime News Mumbai: तीन मुलांची आई, जुना प्रियकर अन् मुंबईतील फसवणूक! नाल्यात सापडलेल्या मृतदेहाने उघड केली खळबळजनक कहाणी
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बिजनौरच्या सडकपूर गावातील रुखसाना हिचे लग्नापूर्वी तिच्याच गावातील साकीब नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, सामाजिक परिस्थितीमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. रुखसानाचा विवाह कंठ गावातील एका तरुणाशी झाला आणि त्यांना तीन मुलेही झाली.
संसार सुरळीत सुरू असतानाच, २०२६ मध्ये रुखसाना पुन्हा एकदा तिच्या जुन्या प्रियकराच्या (साकिब) संपर्कात आली. दोघांमधील संभाषण आणि भेटीगाठी वाढल्या. कुटुंबीयांनी तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु रुखसानाने पती आणि निष्पाप मुलांसोबत राहण्यास ठाम नकार दिला. शेवटी हट्टाला पेटून ती मुंबईत ऑटो रिक्षा चालवणाऱ्या साकिबकडे निघून आली.
मुंबईत आल्यानंतर रुखसानाला एका मोठ्या सत्याचा सामना करावा लागला. तिचा प्रियकर साकीब हादेखील आधीच विवाहित होता. काही दिवसांतच साकिबची पत्नीही मुंबईत राहण्यासाठी आली. यामुळे साकिबच्या पत्नीमध्ये आणि रुखसानामध्ये सतत भांडणे आणि तीव्र वाद सुरू झाले. याच वादाच्या पार्श्वभूमीवर, गत २६ सप्टेंबर रोजी रुखसाना मुंबईतील सांताक्रूझ परिसरातून अचानक रहस्यमयरित्या गायब झाली. ती घरी न परतल्याने साकिबने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध सुरू केला, पण कित्येक दिवस तिचा कोणताही पत्ता लागला नाही.
अखेर १८ ऑक्टोबर रोजी वांद्रे परिसरातील एका कचराकुंडीजवळील नाल्यात एक दुर्गंधीयुक्त, कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. पोलिसांनी पाहणी केली असता तो मृतदेह बेपत्ता रुखसानाचाच असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर रुखसानाच्या वडिलांनी तिचा प्रियकर साकिबवरच रुखसानाची हत्या केल्याचा थेट आणि गंभीर आरोप केला आहे. ऐन विवाहाच्या आणि संसाराच्या वळणावर प्रियकरासाठी सर्वकाही सोडणाऱ्या रुखसानाच्या या शोकांतिकेमुळे तिच्या मूळ गावी आणि मुंबईत मोठी हळहळ व्यक्त होत आहे. रुखसानाच्या कुटुंबीयांनी कठोर न्यायाची मागणी केली असून, मुंबई पोलीस या हत्याकांडामागील नेमके गूढ उकलण्यासाठी सखोल तपास करत आहेत.
Ans: रुखसाना मूळची उत्तर प्रदेशातील बिजनौर (सडकपूर) येथील होती; ती पती व ३ मुलांना सोडून तिचा प्रियकर साकिबकडे मुंबईत आली होती.
Ans: १८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे परिसरातील एका कचराकुंडीजवळील नाल्यात तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
Ans: रुखसानाच्या वडिलांनी तिचा प्रियकर साकिब याच्यावरच तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे.