Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amgaon Murder Case: माजी प्राध्यापकाची विटांनी ठेचून निर्घृण हत्या! बोथली शेतशिवारातील घटनेने गोंदिया हादरले…

Amgaon Murder Case: आमगावजवळील बोथली गावातील शेतशिवारात माजी प्राध्यापक चंद्रशेखर दहीकर यांची अज्ञात व्यक्तींनी विटांनी ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतात कुक्कुटपालन करत एकटेच राहणाऱ्या दहीकर यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 28, 2026 | 04:47 PM
Amgaon Murder Case: माजी प्राध्यापकाची विटांनी ठेचून निर्घृण हत्या! बोथली शेतशिवारातील घटनेने गोंदिया हादरले...

Amgaon Murder Case: माजी प्राध्यापकाची विटांनी ठेचून निर्घृण हत्या! बोथली शेतशिवारातील घटनेने गोंदिया हादरले...

Follow Us
Follow Us:
  • गोंदियात बोथलीत माजी प्राध्यापक चंद्रशेखर दहीकर यांची हत्या
  • सकाळी घरासमोर त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला
  • पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे
Amgaon Murder Case: आमगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बोथली गावातील शेतशिवारातून एक अतिशय धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सेवानिवृत्त/माजी प्राध्यापक चंद्रशेखर दहीकर यांची अज्ञात हल्खोरांनी विटांनी ठेचून अतिशय निर्घृण हत्या केली आहे. शेतातील त्यांच्या निवासस्थानासमोरच रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण बोथली गावामध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Crime News Mumbai: तीन मुलांची आई, जुना प्रियकर अन् मुंबईतील फसवणूक! नाल्यात सापडलेल्या मृतदेहाने उघड केली खळबळजनक कहाणी

नेमकी कशी घडली घटना?

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चंद्रशेखर दहीकर हे ठाणाटोला-जवरी मार्गावर असलेल्या बोथली गावाच्या शेतशिवारात आपले घर बांधून एकटेच राहत होते. शेतातील या निवासस्थानी राहून ते कुक्कुटपालनाचा (Poultry Farming) व्यवसाय सांभाळत होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी त्यांच्या शेतातील घरावर येऊन त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्खोरांनी विटांनी त्यांच्या डोक्यावर व शरीरावर बेदम मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने चंद्रशेखर दहीकर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

शेतकऱ्याला दिसला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह

सकाळी नेहमीप्रमाणे शेजारील शेतात कामासाठी जाणाऱ्या एका शेतकऱ्याला चंद्रशेखर दहीकर यांचा मृतदेह त्यांच्या घरासमोरील वनविभागाच्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. हे भीषण दृश्य पाहताच हादरलेल्या शेतकऱ्याने लागलीच बोथली ग्रामपंचायतीच्या सरपंचांशी संपर्क साधून घटनेची कल्पना दिली. सरपंचांनी क्षणाचाही विलंब न लावता आमगाव पोलिसांना या हत्याकांडाची माहिती दिली.

हेही वाचा: Jalgaon Accident News: संसाराची सुरुवात होण्यापूर्वीच नियतीने साधला घाला; पाळधी-तरसोद बायपासवर तरुणाचा करुणास्पद अंत

आमगाव पोलिसांकडून हत्येचा तपास सुरू; आरोपींचे आव्हान

घटनेची बातमी मिळताच आमगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. माजी प्राध्यापकाची हत्या जुन्या वैमनस्यातून झाली, चोरीच्या उद्देशाने झाली की त्यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. एकट्या राहणाऱ्या माजी प्राध्यापकाची अशा प्रकारे हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अज्ञात आरोपींचा सुगावा लावून त्यांना लवकरात लवकर बेड्या ठोकण्याचे मोठे आव्हान आमगाव पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही हत्येची घटना कुठे व कोणाची घडली आहे?

    Ans: ही घटना आमगाव पोलीस ठाण्याअंतर्गत बोथली गावातील शेतशिवारात घडली असून मृत व्यक्ती माजी प्राध्यापक चंद्रशेखर दहीकर आहेत.

  • Que: हत्येचा प्रकार कसा उघडकीस आला?

    Ans: सकाळी शेजारील शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याला दहीकर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्याने हे हत्याकांड उघडकीस आले.

  • Que: पोलिसांची प्राथमिक कारवाई काय आहे?

    Ans: आमगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून हत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Amgaon bothali former professor chandrashekhar dahikar murdered in farmhouse news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Gondia Crime
  • Murder Case

संबंधित बातम्या

आधी त्रास, नंतर मारहाण अन् अखेर खून; एकतर्फी प्रेमातून महिलेला संपवलं
1

आधी त्रास, नंतर मारहाण अन् अखेर खून; एकतर्फी प्रेमातून महिलेला संपवलं

Pune High Profile Case: पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा! छापा टाकताच अधिकारीही चक्रावले
2

Pune High Profile Case: पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा! छापा टाकताच अधिकारीही चक्रावले

Dhule Accident News: धुळ्यात दुर्दैवी घटना! सहामाही परीक्षा संपताच नदीत पोहायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
3

Dhule Accident News: धुळ्यात दुर्दैवी घटना! सहामाही परीक्षा संपताच नदीत पोहायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

शेतकरी चंद्रकांत शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, तिघांना अटक; मुख्य आरोपीचा शोध सुरू
4

शेतकरी चंद्रकांत शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, तिघांना अटक; मुख्य आरोपीचा शोध सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.