डोमा गावात वादातून दाम्पत्याला बेदम मारहाण
कल्याण पश्चिममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कैऱ्या तोडण्यास गेलेल्या मुलांचा काही मुलांशी वाद झाला. या वादातून एका गटाने भर रस्त्यात एका मुलाच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट, मेंदूरोग तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडल्या दोन गोळ्या
ही घटना कल्याण कल्याण पश्चिमकडील जोशी बाग परिसरातील घडली आहे. रायसिंग खुशवाह असे हल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते जोशी बाग परिसरात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. खुशवाह यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, रायसिंग खुशवाह यांचा लहान मुलगा शुक्रवारला (18 एप्रिल) आपल्या काही मित्रांसोबत जोशी बाग परिसरातच कैऱ्या तोडण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा याच परिसरातील काही मुलांशी त्याचा वाद झाला. या वादामुळे संतापलेला मुलांचा एक गट जोशी बाग परिसरात खुशवाह पाणीपुरी विकत असलेल्या ठिकाणी आला. त्यांनी खुशवाह यांना मुलाबाबत विचारणा करत खुशवाह याना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झालं. मुलांच्या गटाने आपल्या जवळील चाकूने खुशवाह यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात खुशवाह जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केलाय. हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पतीने केला आपल्याची पत्नीवर वार
नवी मुंबई शहरातील मीरा रोडच्या रामदेव पार्क परिसरात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. पतीने आपल्याच पत्नीवर थेट चाकू हल्ला केला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना भाईंदर पूर्वेतील रामदेव पार्क परिसरातील विमलनाथ इमारतीत घडली. गीता छेत्री (वय अंदाजे 35 वर्षे) असं हल्ला झालेल्या महिलेचं नाव असून पतीने अचानकपणे चाकूने केलेल्या हल्ल्यात अरुण छेत्रीगंभीर जखमी झाल्या आहेत. पती-पत्नीचं भांडण हे कोणासाठी नवीन नाही, मात्र पत्नीवर थेट चाकू हल्ला केल्याने ह्या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवरही व्हायरल झाला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.