Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मायलेकीच्या नात्याला काळीमा! 6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून…, मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या

Navi Mumbai Crime: कळंबोलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  मायलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना म्हणजे मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या करण्यात आली. या घटनेने सर्वत्र गोंधळ उडाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 26, 2025 | 04:28 PM
6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून..., मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या

6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून..., मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या

Follow Us
Close
Follow Us:
  • मायलेकीच्या नात्याला काळीमा
  • मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या
  • कळंबोलीत धक्कादायक घटना समोर
सावन वैश्य | नवी मुंबई : ‘पहिली बेटी धनाची पेटी’ असे म्हटले जाते. समाजात आज मुलगा-मुलगी असा भेद उरलेला नसल्याचे वारंवार सांगितले जाते. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना, नवी मुंबईतील कळंबोली परिसरात घडलेल्या एका अमानुष घटनेने समाजमन हादरून गेले आहे. मुलगी नको होती म्हणून एका आईनेच आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

कळंबोलीत राहणारी सुप्रिया प्रमोद म्हामुनकर (वय ३० वर्षे) हिला पहिलं अपत्य मुलगी झाल्यापासून ती असमाधानी होती. मुलगी नको असल्याची भावना तिच्या मनात खोलवर रुजली होती. या कारणावरून ती मुलीशी वारंवार तिरस्काराने वागत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

 ‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी घरात कोणीही नसताना सुप्रियाने आपल्या सहा वर्षांच्या मुलीचे नाक व तोंड दाबून श्वास रोखला, तसेच मऊ व बोथट वस्तूने तिच्या ओटीपोटावर दाब देऊन तिची हत्या केली. प्राथमिक तपासात हा खून पूर्वनियोजित नसला, तरी दीर्घकाळ मनात असलेल्या द्वेषातूनच हा अमानुष कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुलगी नीट बोलत नसणे आणि सतत हिंदी भाषेत बोलणे यासारखी क्षुल्लक कारणे देत आरोपी आई मुलीवर राग काढत होती. या निर्दयी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मायलेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेबद्दल नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. चौकशीअंती आरोपी सुप्रिया म्हामुनकर हिला अटक करण्यात आली असून, भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भारत देशात नारीशक्तीची पूजा केली जाते. नवरात्रीत कुमारी पूजन केले जाते, महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे आणि देशाच्या सर्वोच्च पदावर महिला राष्ट्रपती विराजमान आहेत. अशा काळात घडलेली ही घटना समाजाला अंतर्मुख करणारी असून, स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलगी नको या मानसिकतेविरुद्ध अजूनही मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे अधोरेखित करते. या हृदयद्रावक घटनेमुळे कळंबोलीसह संपूर्ण नवी मुंबई परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Waluj MIDC Fraud Case: वाळूज एमआयडीसीत मोठी फसवणूक! पाईप सप्लायरला ९१ लाखांचा गंडा; पुण्यातील उद्योजक पती-पत्नीवर गुन्हा दाखल

Web Title: In kalamboli a girl was unwanted so her mother aborted her unborn child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Khopoli Crime : शिंदेंच्या सेनेतील नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, काळ्या रंगाच्या कारमधून उतरले अन्… खोपीलीमध्ये एकच खळबळ
1

Khopoli Crime : शिंदेंच्या सेनेतील नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, काळ्या रंगाच्या कारमधून उतरले अन्… खोपीलीमध्ये एकच खळबळ

Kokan Railway मधून प्रवास करताय? मग ‘ही’ बातमी नक्की वाचाच; गेल्या सात महिन्यांत…
2

Kokan Railway मधून प्रवास करताय? मग ‘ही’ बातमी नक्की वाचाच; गेल्या सात महिन्यांत…

शासन निर्णय धाब्यावर? नवी मुंबईत नाताळच्या रात्री क्लब चालकांना पोलिसांकडून नाहक त्रास; आयुक्तांकडे दाद मागण्याची वेळ
3

शासन निर्णय धाब्यावर? नवी मुंबईत नाताळच्या रात्री क्लब चालकांना पोलिसांकडून नाहक त्रास; आयुक्तांकडे दाद मागण्याची वेळ

Bihar Crime: नवऱ्याच्या संशयातून सूड! ब्यूटी पार्लर महिलेवर अ‍ॅसिड हल्ल्यासाठी 1 लाखांची सुपारी
4

Bihar Crime: नवऱ्याच्या संशयातून सूड! ब्यूटी पार्लर महिलेवर अ‍ॅसिड हल्ल्यासाठी 1 लाखांची सुपारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.