Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar crime: भाईंदरमध्ये खळबळ! गुरुद्वारासमोरील झुडपांत सापडला अर्धनग्न जळालेला मृतदेह; पोलीस तपास सुरु

भाईंदर पूर्व येथील गुरुद्वारासमोरील मैदानातील झुडपांमध्ये अर्धनग्न अवस्थेत जळालेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दुर्गंधी आल्याने नागरिकांनी पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला. नवघर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ओळख पटविण्यासह खूनाचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 06, 2026 | 12:41 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • भाईंदर पूर्वेतील गुरुद्वारासमोरील झुडपांत जळालेला अर्धनग्न मृतदेह आढळला.
  • दुर्गंधी आल्याने स्थानिक नागरिकांना हा प्रकार उघडकीस आला.
  • नवघर पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि फॉरेन्सिकच्या मदतीने तपास सुरू.
विजय काते, भाईंदर: भाईंदर पूर्व येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुद्वारासमोरील मैदानातील झुडपांमध्ये अर्धनग्न अवस्थेत जळालेला मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास आढळून आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास करत आहे.

काय घडलं नेमकं?

शनिवारी सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना झुडपांमधून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. नवघर पोलिस पोलिसांचे पथक आणि श्वानपथक (Dog Squad) घटनास्थळी दाखल झाले आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला असावा का, या दिशेने कसून तपास सुरू आहे.

UP Crime : ‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला हत्येचा कट, बुरखा घालत फुल-प्रुफ प्लॅनिंगने केला मित्राचा खून

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. परिसरातील किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारींची (Missing Persons) पडताळणी केली जात आहे.

तपास सुरु

या घटनेमुळे भाईंदर पूर्व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये विविध चर्चेला उधाण आले आहे. नवघर पोलिस पुढील तपास करत आहेत.

चार वर्षीय मुलाच्या मृत्यूचे गूढ उलगडले! आईच्या प्रियकराकडून हत्या; मृतदेह नाल्यात फेकून अपघाताचा बनाव

काशिमीरा परिसरातील नीलकमल नाका येथील नाल्यात मृतावस्थेत आढळलेल्या चार वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचे गूढ काशिमीरा पोलिसांनी उलगडले असून, हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुलाच्या आईच्या प्रियकराने बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्यात फेकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मंगळवारी सकाळी नीलकमल नाका परिसरातील एका उघड्या नाल्यात चार वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना काही बाबी संशयास्पद वाटल्याने तपासाची दिशा बदलली. तपास अधिकारी महाजन यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात आला. अहवालातून हा मृत्यू अपघाती नसून मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

‘त्या’ पोलिसांचे मुख्य आरोपीला शेकडो कॉल्स! विषारी दारू कांडप्रकरणी चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कुठे आढळला?

    Ans: भाईंदर पूर्व येथील गुरुद्वारासमोरील मैदानातील झुडपांमध्ये मृतदेह आढळला.

  • Que: मृतदेहाची अवस्था कशी होती?

    Ans: मृतदेह अर्धनग्न आणि जळालेल्या अवस्थेत होता.

  • Que: पोलिसांकडून कोणता तपास सुरू आहे?

    Ans: पोलिस सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक तपास आणि मृताची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

Web Title: Mira bhayandar crime shock in bhayandar semi naked burnt body found in bushes opposite the gurudwara police investigation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • crime
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक
1

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
2

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा
3

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!
4

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.