Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Cyber Crime: गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान! APK फाइल पाठवून ज्येष्ठ महिलेचे ७ लाख ९६ हजार लंपास

Dharashiv Cyber Crime: धाराशिवमध्ये गॅस पाइपलाइन कनेक्शन अपडेट करण्याच्या नावाखाली एका ज्येष्ठ महिलेची ७ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सायबर भामट्यांनी महिलेला बनावट गॅस बिल आणि APK फाइल पाठवून बँक खात्यातील रक्कम लंपास केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी धाराशिव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 23, 2026 | 04:58 PM
गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान! APK फाइल पाठवून ज्येष्ठ महिलेचे ७ लाख ९६ हजार लंपास

गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान! APK फाइल पाठवून ज्येष्ठ महिलेचे ७ लाख ९६ हजार लंपास

Follow Us
Follow Us:
  • गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान!
  • बनावट गॅस बिल अन् APK फाइलचा सायबर सापळा
  • धाराशिवमध्ये ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यावर डल्ला
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : गॅस पाइपलाइन कनेक्शन अपडेट करण्याच्या नावाखाली एका ज्येष्ठ महिलेची तब्बल ७ लाख ९६ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना धाराशिव शहरात उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने बनावट गॅस बिल अपडेट करण्यासाठी एपीके फाइल पाठवून महिलेच्या बँक खात्यातून रक्कम काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dharashiv Cyber Crime)

लता अनिल घुगे (वय ६६, रा. उंबरे कोठा, बार्शी नाका परिसर, धाराशिव) यांच्यासोबत २१ ऑक्टोबर रोजी ही फसवणूक झाल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे. त्या घरी असताना अज्ञात व्यक्तींनी गॅस पाइपलाइन कनेक्शन अपडेट करण्याच्या नावाखाली त्यांच्याशी संपर्क साधला. त्यासाठी बनावट गॅस बिल अपडेट करण्याची प्रक्रिया असल्याचे भासवून संबंधित मोबाईल क्रमांकांवरून एपीके फाइल पाठविण्यात आली.

पुण्यातील नाट्यगृहांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिकेकडून दुरुस्तीची कामे; नेहरू भवन ‘या’ तारखेपर्यंत बंद

या प्रकारातून घुगे यांच्या बँक ऑफ इंडिया येथील खात्यातून एकूण ७ लाख ९६ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी २२ ऑक्टोबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.

नागरिकांनी घ्यावी खबरदारी

अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या एपीके फाइल मोबाईलमध्ये डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नयेत.
गॅस कनेक्शन किंवा बिल अपडेट करण्याच्या नावाखाली आलेल्या संशयास्पद संदेशांची अधिकृत यंत्रणेकडून खात्री करावी.
बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा अन्य गोपनीय तपशील अनोळखी व्यक्तींना देऊ नयेत.
ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा आणि अधिकृत सायबर तक्रार नोंदवावी.

नक्की आपण खातोय काय? Pune शहरात ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा अन्…; FDA ची धडक कारवाई

Web Title: Dharashiv gas pipeline update cyber fraud senior woman loses rs 7 96 lakh sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • crime
  • cyber crime
  • Dharashiv

संबंधित बातम्या

‘शाळेवर ग्रेनेड हल्ला, तर महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोट…’, मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी
1

‘शाळेवर ग्रेनेड हल्ला, तर महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोट…’, मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी

MCOCA Action: बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीला ‘मकोका’चा दणका! आरटीआय कार्यकर्ता असल्याचा आव आणून धमकावले
2

MCOCA Action: बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीला ‘मकोका’चा दणका! आरटीआय कार्यकर्ता असल्याचा आव आणून धमकावले

ऑटोमोबाईल पार्ट्स बनवणाऱ्या शॅफलर इंडियाच्या CEO ताब्यात! तळेगाव कारखाना गॅस गळती दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई
3

ऑटोमोबाईल पार्ट्स बनवणाऱ्या शॅफलर इंडियाच्या CEO ताब्यात! तळेगाव कारखाना गॅस गळती दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई

Maharashtra Drought 2026: दुष्काळात ५ हजारांची घोषणा; शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला साडीचोळीचा ‘आहेर’
4

Maharashtra Drought 2026: दुष्काळात ५ हजारांची घोषणा; शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला साडीचोळीचा ‘आहेर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.