crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
राजस्थान: राजस्थान उच्च न्यायालयाने मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. एका १९ वर्षिय तरुणाला सोशल मीडियाचा गैरवापर करणं महागात पडलं आहे. न्यायालयाने त्याला तीन वर्षांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर बंदी आणली आहे. त्या अटीवर त्याला जमीन मंजूर केला आहे. नेमकं त्याने कोणता गुन्हा केला आहे आणि प्रकरण काय आहे? जाणून घेऊया.
कराडमध्ये मोबाईल बदलण्यावरुन वाद; दुकानातील कर्मचाऱ्याने धक्का दिला अन् पुढे जे घडलं…
नेमकं काय प्रकरण?
एका १९ वर्षीय तरुणाने बनावट अकाउंट तयार करून एका २३ वर्षीय विवाहित महिलेचे फोटो आणि व्हिडिओ एडिट करून व्हायरल केले होते. या प्रकरणात सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, आरोपीने बनावट खात्याचा वापर करून पीडितेच्या फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले. ज्यामुळे तिच्या वैवाहिक जीवनावर परिणाम झाल्याचा समोर आलं आहे. अश्या व्यक्तीला कोणतीही अट न घालता जमीन देऊ नये.
दुसरीकडे, बचाव पक्षाने आरोप फेटाळत आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा दावा केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती अशोक जैन यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
काय म्हंटल कोर्टाने?
न्यायमूर्ती जैन यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले की, आरोपीला जामीन मिळाल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, जसे की फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर कोणत्याही ॲपवर लॉग इन करण्याची परवानगी नसेल. याशिवाय, आरोपीला पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवण्यास सक्त मनाई आहे. न्यायालयाने आरोपीला तात्काळ सर्व एडिटेड फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्याचे आदेशही दिले आहेत.
वकील गिरीश खंडेलवाल यांनी सांगितले की, आरोपीला एक शपथपत्र (affidavit) सादर करावे लागेल, ज्यात त्याने महिलाशी संबंधित कोणतेही फोटो-व्हिडिओ आता त्याच्याकडे नाहीत, याची खात्री द्यावी लागेल. तसेच, न्यायालयाने अशी ताकीद दिली आहे की, जर आरोपीने जामिनाच्या कोणत्याही अटीचे उल्लंघन केले, तर त्याचा जामीन आपोआप रद्द होईल. या निर्णयामुळे सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांना धडा मिळू शकतो आणि भविष्यात अशी प्रकरणं टाळण्यासाठी समाजात सजगता निर्माण होऊ शकते.
Beed Crime: बीड येथील गुन्हेगारी काही थांबेना! गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग