Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण: आमदार जगताप आक्रमक; म्हणाले, “घटना दुर्दैवी आहे, तितकीच…”

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल होऊ न दिल्याने एका अत्यवस्थ गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डिपॉझिटची रक्कम भरली नसल्यामुळे तातडीने उपचार न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 04, 2025 | 08:41 PM
मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण: आमदार जगताप आक्रमक; म्हणाले, “घटना दुर्दैवी आहे, तितकीच…”
Follow Us
Follow Us:

पिंपरी: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिटच्या कारणावरून उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणावर आमदार शंकर जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, धर्मदाय रुग्णालयांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, याबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल होऊ न दिल्याने एका अत्यवस्थ गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डिपॉझिटची रक्कम भरली नसल्यामुळे तातडीने उपचार न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली असून, रुग्णालय प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आमदार जगताप यांची तीव्र संतप्त प्रतिक्रिया

या घटनेबाबत चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “घडलेली घटना जितकी दुर्दैवी आहे, तितकीच संतापजनक आहे. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

आमदार जगताप यांनी पुढे बोलताना धर्मदाय रुग्णालयांच्या कारभारावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. “फक्त दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच नव्हे, तर इतर धर्मदाय रुग्णालयांचीही निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच, या प्रकरणात दोषी आढळलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी नेमली चौकशी समिती

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ चौकशी समिती नेमून आवश्यक पावले उचलली आहेत. “मला पूर्ण विश्वास आहे की, या प्रकरणात दोषींवर कोणतीही गय केली जाणार नाही,” असे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.

डिपॉझिटच्या प्रथेबाबत नवा नियम आवश्यक

या घटनेच्या निमित्ताने रुग्णांना दाखल करताना मागवण्यात येणाऱ्या डिपॉझिटच्या अटीवरही गंभीर चर्चा सुरू झाली आहे. “अनेक रुग्ण आर्थिक कारणांमुळे वेळेत उपचार मिळवू शकत नाहीत, त्यामुळे सरकारने नवीन नियमावली तयार करून तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे,” असे मत आमदार जगताप यांनी व्यक्त केले.

शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्या धर्मदाय रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी करत आमदार जगताप यांनी ठाम भूमिका घेतली आहे. “जर रुग्णालये नियमांचे पालन करत नसतील, तर त्यांच्या जागा सरकारने पुन्हा ताब्यात घ्याव्यात, अशी जनभावना आहे, आणि मीही याच मताचा आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Web Title: Mla shankar jagtap aggressive about dinanath mangeshkar hospital pregnant woman case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 08:35 PM

Topics:  

  • crime news
  • Dinanath Mangeshkar Hospital
  • Pune

संबंधित बातम्या

Nasarapur Case: चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अशा नराधमांना…’
1

Nasarapur Case: चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अशा नराधमांना…’

Nasrapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; पीडित चिमुकलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर
2

Nasrapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; पीडित चिमुकलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर

Nasrapur Crime: नसरापूर प्रकरणातील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, बलात्कार आणि हत्येप्रकरणी कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
3

Nasrapur Crime: नसरापूर प्रकरणातील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, बलात्कार आणि हत्येप्रकरणी कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Ketan Agrawal Case: एकाच रूममध्ये राहायचं नव्हतं म्हणून केतनचा काटा? सियाच्या चौकशीत धक्कादायक खुलासे
4

Ketan Agrawal Case: एकाच रूममध्ये राहायचं नव्हतं म्हणून केतनचा काटा? सियाच्या चौकशीत धक्कादायक खुलासे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.