
घरातून बाहेर पडले अन् परतलेच नाहीत! कळंब तालुक्यात दोन तरुणांच्या अपहरणाने खळबळ
कळंब तालुक्यातील डिकसळ येथील एकतानगर भागातील रहिवासी संदीप बाबुराव फकीर (वय ३२) हा तरुण ४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ‘हैदराबाद येथे फिरायला जातो,’ असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो परत न आल्याने तसेच त्याच्याशी संपर्क न झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
देवधानोरा येथून २९ वर्षीय तरुण बेपत्ता
दुसऱ्या घटनेत, कळंब तालुक्यातील देवधानोरा येथील रहिवासी अमोल मनोहर काळे (वय २९) हा तरुण ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गावातून अचानक बेपत्ता झाला. सर्वत्र शोध घेऊनही त्याचा पत्ता न लागल्याने, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याला डांबून ठेवण्याच्या उद्देशाने गुप्तपणे पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मनोहर मलाप्पा काळे (वय ५५, रा. देवधानोरा) यांनी १२ नोव्हेंबर रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून शिराढोण पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४० (३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. एकाच तालुक्यात दोन तरुणांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली असून, कळंब व शिराढोण पोलीस दोन्ही तरुणांचा कसून शोध घेत आहेत.
घरफोडीचा तपास करताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला
घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी शहरात आलेल्या फुलंब्री पोलिसांच्या तपास पथकावर चौघांनी हल्ला चढविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मिसारवाडीतील अण्णाभाऊ साठे चौकाजवळ घडली आहे. पोलिसांनी ओळखपत्र दाखवूनही हल्लेखोरांनी एका कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले आहे. तसेच अन्य दोन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कारची चावी हिसकावून घेतली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रवि मिसाळ, यश मिसाळ आणि त्यांचे दोन साथीदार अशी पोलिस पथकावर हल्ला चढविणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: कळंब तालुक्यातील डिकसळ आणि देवधानोरा या दोन गावांमधून तरुणांचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Ans: संदीप बाबुराव फकीर (वय ३२, रा. डिकसळ) आणि अमोल मनोहर काळे (वय २९, रा. देवधानोरा) अशी अपहरण झालेल्या तरुणांची नावे आहेत.
Ans: संदीप फकीर यांच्या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात, तर अमोल काळे यांच्या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.