Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेच्या नेत्याचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; रुग्णालयात केलं दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दिलीप धोत्रे यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 15, 2026 | 12:03 PM
मनसेच्या नेत्याचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; रुग्णालयात केलं दाखल

मनसेच्या नेत्याचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; रुग्णालयात केलं दाखल

Follow Us
Follow Us:
  • मनसेच्या नेत्याचा भीषण अपघात
  • मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घटना
  • रुग्णालयात केलं दाखल
पुणे : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज अनेकांना अपघातामध्ये जीव गमवावा लागत आहे. गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील कॉंग्रेस नेता अपघातामध्ये गंभीर जखमी झालेला असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दिलीप धोत्रे यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात धोत्रे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिलीप धोत्रे हे आपल्या खाजगी वाहनाने मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोर येणाऱ्या एका वाहनाना त्यांच्या एक्सप्रेसवेवरील गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यांच्या गाडीचा पुढचा भाग अक्षरश: चक्काचूर झाला. यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात कसा आणि कधी झाला, त्याचे नेमके कारण काय, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातात दिलीप धोत्रे यांच्या छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. विशेषतः पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यात मनसेची बांधणी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या अपघाताची बातमी समजताच मनसे कार्यकर्त्यांनी खळबळ उडाली आहे. अनेकांनी पुण्याच्या दिशेने धाव घेतल्याचेही समजते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर हा अपघात नेमका कशामुळे झाला, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने की अन्य कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : ठाण्यात धक्कादायक घटना; महापालिकेच्या महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

दिलीप धोत्रे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात विद्यार्थी दशेपासून राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून केली. इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या धोत्रे यांनी १९९२ मध्ये पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद भूषवत आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखवली होती. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून सर्वप्रथम त्यांना साथ देणारे ते महत्त्वाचे शिलेदार ठरले. जिल्हा संघटक, शाडो सहकारमंत्री आणि प्रदेश सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांनी सोलापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. याच निष्ठेची दखल घेत नुकतीच त्यांची पक्षाच्या नेतेपदी वर्णी लागली होती.

Web Title: Mns leader meets with serious accident on mumbai pune expressway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Accident Case
  • Dilip Dhotre
  • MNS

संबंधित बातम्या

“तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात, भाजपात सामील व्हा,” RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची आगपाखड
1

“तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात, भाजपात सामील व्हा,” RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची आगपाखड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.