mother committed suicide including two child in deoghar crime news know reason nrvb
देवघर : झारखंडच्या (Jharkhand) देवघरमध्ये (Deoghar Crime News) एका महिलेने (Woman) आपल्या दोन मुलांसह (With Two Children) घरातील वादातून (Dispute) रेल्वेखाली जीव देत (Suicide) आपली जीवनयात्रा संपवली. मुलांचे केस कापण्याच्या नावाखाली गिरीडीह येथील सासरच्या घरातून ती निघून गेली होती त्यानंतर ती घरी परतली नाही. आज जासीडीह पोलीस स्टेशन हद्दीतील जासीडीह-झाझा मुख्य रेल्वे सेक्शनवरील गंगटी गावाजवळ महिला आणि तिच्या दोन मुलांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
मृतांमध्ये ३५ वर्षीय पत्नी प्रमिला देवी, त्यांचा १२ वर्षांचा मुलगा नितेश कुमार आणि ८ वर्षांचा मुलगा अजित यांचा समावेश आहे, हे गिरिडीहच्या देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत माधोपूर गावातील रहिवासी आहेत. गिरिडीह येथील घरातून बाहेर पडल्यानंतर ही महिला परतली नाही, तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी जमुई येथील तिच्या माहेरच्या घरी माहिती दिली. पालकही शोधात गुंतले होते. पण आई आणि मुले काही सापडले नाहीत. ही महिला गिरिडीहहून जसीडीह येथे कशी आली, याची पुष्टी झालेली नाही. महिलेचा पती नोकरीनिमित्त बाहेर राहतो.
[read_also content=”हॉटेलबाहेर उभी होती झायलो कार, दरवाजा उघडताच आढळला चालकाचा मृतदेह, लोकांना बसला धक्का ! कारण वाचून तुम्हीही शहाणे व्हाल https://www.navarashtra.com/crime/jamui-shocking-news-xylo-car-was-parked-outside-hotel-the-dead-body-of-the-driver-was-found-on-opening-people-were-shocked-nrvb-367597.html”]
मृताचा भाऊ चंदन कुमारने सांगितले की, २००५ मध्ये प्रमिलाचा विवाह गिरीहच्या मोहन यादवसोबत झाला होता. लग्नानंतर सर्व काही ठीक चालले होते. त्यानंतर मोहन रोजगारासाठी बाहेर गेला. सासरच्या मंडळींनी प्रमिलाचा छळ सुरू केला. अनेकदा सर्वांच्या संमतीने समजूत काढण्यात आली होती पण छळवणुकीची प्रक्रिया थांबली नाही. त्याचवेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगितले.