Mother strangles two children to death in Patas Daund
पाटस : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता दौंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जन्मदात्याने आईनेच मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पाटससध्ये घडली आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील मिंढे वस्ती आईनेच अडीच वर्षांच्या मुलीला आणि एक वर्षाच्या मुलाला गळा दाबून खून केला आहे. त्याचबरोबर पतीच्या मानेवर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती दौंड पोलिसांनी दिली.
मुलगी पिऊ दुर्योधन मिंढे (वय अडीच वर्षे), मुलगा शंभू दुर्योधन मिंढे (वय एक वर्षं )या चिमुकल्यांच्या गळा दाबून आईनेच खून केला आणि नंतर पती दुर्योधन बाळासाहेब मिंढे याच्या मानेवर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यामध्ये पती गंभीर जखमी असून त्याला बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आरोपी महिलेला एकाच वेळी संपूर्ण कुटुंब संपवायचं होते, असंच यातून दिसून येते. ही घटना शनिवारी (दि 08) पहाटे 4 वाजण्याच्या आसपास घडली. दुर्योधन यांची पत्नी कोमल दुर्योधन मिंढे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांवर हल्ला
पुण्यामध्ये वाहतूक पोलीस हलवालदारावर हल्ला करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक (वय ४७) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस हवालदार राजेश नाईक फुरसुंगी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी भेकराईनगर चौकात वाहतूक नियमाचे कर्तव्य करत होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकीवर जाणारा व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होता. नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नको असे सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी नाईक यांना शिवीगाळ करत वाद घातला. वाद इतका विकोपाला गेला की तरुणाने दुचाकी थांबवून त्यांच्याशी वाद घातला. तर हमरी-तुमरीवर येऊन रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला. अचानक झालेल्या हल्ल्यात राजेश हे गंभीर जखमी झाले.