
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं काय घडलं?
कांदिवली चारकोप परिसरात बंदर पाखाडी येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञाताकडून विकासक फ्रेंडी दिलीमा भाईवर गोळीबार केला. ते कारमध्ये बसले असता दोघांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अज्ञातांनी दोन ते तीन राऊंड फायर केले, त्यामध्ये दिलीमा भाईच्या पोटात दोन गोळ्या घुसल्या. गोळीबारानंतर अज्ञात तरुण घटनासथळावरून फरार झाले.
जखमी विकासकाला तात्काळ बोरिवली येथील ऑस्कर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. फ्रेंडीभाई हा तरुण बांधकाम विकास आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर चारकोप पोलीस आणि डीसीपी तात्काळ घटनास्थळी पोहोचेल असून वेगवेगळ्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा तपासून आरोपीचे शोध घेत आहेत. तर, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. मुंबई शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोघ घेतला जात आहे.
मनसेचा पोलिसांना अल्टिमेटम
मनसेने पोलिसांना अल्टिमेटम दिल्याचं समोर आलं आहे. कांदिवली- चारकोपमध्ये गुंडांचा कब्जा असल्याचा आरोप मनसेने केले आहे. कांदिवली चारकोप परिसरात गोळीबार नेहमीचा आणि रोजचाच आहे. नवरात्रीत यादवचा खून, त्यानंतर शेखरवर गोळ्या, नागरिकांना धास्तावून टाकणाऱ्या सलग घटनांनी परिसर अक्षरशः दहशतीखाली आहे. चव्हाण–यादव टोळीतल्या वादातही गोळीबार झाला असून गुन्हेगार बेधडक पोलिस मात्र शांत आहेत. इथल्या “दहा घरांत तपासणी केली तर एका घरात गावठी कट्टा निघेल… चारकोपला बिहार बनवू देणार नाही,” असे मनसे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी म्हटले. पोलिसांनी तात्काळ घरोगरी तपासणी सुरू करावी, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून जनता संरक्षणासाठी उभा राहील, असेही त्यांनी म्हटले.
Crime News: नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बाईकर्सवर गुन्हा; नेरूळ पोलिसांची कारवाई
Ans: कांदिवली
Ans: फ्रेंडी
Ans: फरार