Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime News: लोकलमध्ये महिलांच्या डब्यात घुसला, महिलांसोबत लज्जास्पद कृत्य; पोलिसांवर विश्वास ठेवायचा की नाही?

प्रत्यक्षदर्शी महिलांच्या म्हणण्यानुसार,  किशोर सपकाळे याने दारू प्यायली होती. दारूच्या नशेतच तो महिलांच्या डब्यात शिरला. पण तिथेच न थांबता त्याने महिलांसोबत अश्लील कृत्ये करण्यास सुरुवात केली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 03, 2025 | 03:07 PM
Mumbai Crime News: लोकलमध्ये महिलांच्या डब्यात घुसला, महिलांसोबत लज्जास्पद कृत्य; पोलिसांवर विश्वास ठेवायचा की नाही?
Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Crime News:  मीरा-भाईंदरमधून एक संताप आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका गणवेशधारी पोलिस कॉन्स्टेबलने गणवेशावरच  महिलांशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.  दारूच्या नशेत असलेला हा कॉन्स्टेबल शनिवारी दुपारी बोरिवलीहून वसईला जाणाऱ्या स्लो लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात चढला आणि तिथे उपस्थित असलेल्या महिलांचा विनयभंग करू लागला.

मिळालेल्या माहितीनुसार,  शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडली. बोरिवलीहून निघालेली लोकल ट्रेन मीरा रोड स्टेशनवर येताच, अमोल किशोर सपकाळे नावाचा एक कॉन्स्टेबलचे नाव असून तो वर्दीमध्ये असतानाच खाकी गणवेशात महिलांच्या डब्यात चढला.

Yugendra Pawar Sakharpuda : यंदा पवार कुटुंबामध्ये लगीनघाई! युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न

प्रत्यक्षदर्शी महिलांच्या म्हणण्यानुसार,  किशोर सपकाळे याने दारू प्यायली होती. दारूच्या नशेतच तो महिलांच्या डब्यात शिरला. पण तिथेच न थांबता त्याने महिलांसोबत अश्लील कृत्ये करण्यास सुरुवात केली. काही महिलांनी सांगितले की तो जाणूनबुजून त्यांच्या पाठीला कोपराने स्पर्श करत होता. तसेच, तो सीटवर बसून काहीं महिलांकडे जाणीवपूर्वक तिकिटे मागण्याचे नाटक करत होता.

घाणेरड्या नजरेने पाहत होता, फोनही हिसकावून घेतला

 लोकल ट्रेनमध्ये ड्युटीवरील एका कॉन्स्टेबलने केलेल्या गैरवर्तनामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नायगाव स्थानकाजवळ घडलेल्या या प्रकारामुळे महिलांनी संतापून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला गाडीतून उतरवून तक्रार दाखल केली.

BSNL’s Freedom Offer: BSNL ने उडवली Airtel ची झोप! अनलिमिटेड कॉलिंग आणि 2GB डेटा मिळणार केवळ

 अमोल सपकाळे नावाचा पोलिस कॉन्स्टेबल लोकल ट्रेनमध्ये महिलांशी असभ्य वर्तन करत होता. त्याच्या वागणुकीमुळे महिला प्रवासी अस्वस्थ झाल्या. त्याने एक-दोन महिलांचे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावल्याचेही सांगितले जात आहे. यामुळे महिलांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.

शेवटी त्रास सहन न करता महिलांनी मिळून नायगाव स्थानकात त्याला उतरवले आणि स्टेशन मास्तराकडे तक्रार केली. स्थानक मास्तरांनी तात्काळ वसई रोड रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अमोल सपकाळे याला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत तो मद्यधुंद असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी वसई येथील रहिवासी अभया अक्षय वर्णेकर यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून वसई रोड रेल्वे पोलिसांनी भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ७४ (महिलांच्या मर्यादेचे उल्लंघन) आणि कलम ३५१ (२) (धमकी व जबरदस्ती) अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

या घटनेनंतर महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “जर गणवेशातील पोलिसच असुरक्षितता निर्माण करत असतील, तर सामान्य प्रवासी कुणावर विश्वास ठेवायचा?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे महिलांच्या डब्यांमध्ये सुरक्षेचे अधिक उपाय योजावेत, अशी मागणी प्रवाशांकडून रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडे होत आहे.

Web Title: Mumbai crime news police constable arrested for entering local and committing shameful acts with women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Mumbai crime news
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
1

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
2

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं; भाजप जिल्हा उपाध्यक्षासह एकाची निर्घृण हत्या, एकजण गंभीर जखमी
3

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं; भाजप जिल्हा उपाध्यक्षासह एकाची निर्घृण हत्या, एकजण गंभीर जखमी

Mumbai Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर पाच अल्पवयीनांनी केलं अत्याचार; पीडिताचे अश्लील व्हिडीओ चित्रित केलेले दाखवून ब्लॅकमेलिंग
4

Mumbai Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर पाच अल्पवयीनांनी केलं अत्याचार; पीडिताचे अश्लील व्हिडीओ चित्रित केलेले दाखवून ब्लॅकमेलिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.