BSNL’s Freedom Offer: BSNL ने उडवली Airtel ची झोप! अनलिमिटेड कॉलिंग आणि 2GB डेटा मिळणार केवळ 1 रुपयांत, इतकी आहे व्हॅलिडीटी
सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL पुन्हा एकदा भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने आता एक असा प्लॅन लाँच केला आहे ज्याने भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या Airtel ची झोप उडणार आहे. स्वतंत्रता दिवसच्या निमित्ताने कंपनीने आकर्षक ऑफर आणली आहे. ही ऑफर अत्यंत खास आहे कारण यामध्ये ग्राहकांना केवळ 1 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग आणि 2GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची असणार आहे. ही ऑफर विशेषतः नवीन बीएसएनएल ग्राहकांसाठी आहे, ज्याचा उद्देश कंपनीचे अपग्रेडेड नेटवर्क अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आहे.
BSNL ने या ऑफरबाबत त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये कंपनीने या प्लॅनबाबत माहिती देण्यात आली आहे. ‘खरी डिजिटल आझादी’ असं या नव्या प्लॅनला नाव देण्यात आलं आहे. जर ग्राहकांनी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान नवीन बीएसएनएल सिम खरेदी केले तर त्यांना फक्त 1 रुपयांच्या किंमतीत 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन खरेदी करता येणार आहे. या प्लॅनमध्ये देशभरात अमर्यादित कॉलिंग, दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएसचा समावेश आहे. या सर्वांसाठी केवळ 1 रुपया खर्च करावा लागणार आहे.(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने लाँच केलेली ही ऑफर केवळ मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे आणि देशभरत ही ऑफर सुरु करण्यात आली आहे. ग्राहक कोणत्याही अधिकृत बीएसएनएल केंद्रातून फक्त 1 रुपयांत नवीन सिम कार्ड घेऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ऑफरचा लाभ घेण्यासाठी, ग्राहक जवळच्या बीएसएनएल रिटेलर किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) ला भेट देऊ शकतात. सीएससी सेंटर ही अशी ठिकाणे आहेत जिथे बीएसएनएल सिम, बिल पेमेंट आणि रिचार्ज सारख्या सेवा प्रदान करते.
सिर्फ ₹1 में डिजिटल आज़ादी, BSNL के साथ!
फ्री सिम कार्ड पाएं – हर दिन 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स और 100 SMS प्रतिदिन, पूरे 30 दिनों के लिए।यह ऑफर केवल नए उपभोक्ताओं के लिए सीमित अवधि तक उपलब्ध है।#BSNLFreedomOffer #BSNL #BSNLIndia #IndependenceDay #DigitalIndia… pic.twitter.com/GTdRnRBhBP
— BSNL India (@BSNLCorporate) August 3, 2025
TRAI ने अलीकडेच शेअर केलेल्या अहवालानुसार, गेल्या काही महिन्यात BSNL आणि Vi या दोन्ही कंपन्यांनी हजारो ग्राहक गमावले आहेत. या कंपन्यांच्या ग्राहकांनी त्यांचे नंबर इतर टेलिकॉम कपन्यांच्या सिमध्ये पोर्ट केले. आता हीच कमी होत असलेली युजर्सची संख्या पुन्हा एकदा वाढवण्यासाठी BSNL ने एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. ही ऑफर बीएसएनएलच्या डोअरस्टेप सिम डिलिव्हरी सेवेद्वारे उपलब्ध असेल की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
सरकारने बीएसएनएलला प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (एआरपीयू) वाढवण्याचे लक्ष्य दिले आहे. परंतु हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कंपनीने टेरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ करू नये असे निर्देश देखील देण्यात आले आहेत. आता दरमहा आढावा बैठका घेतल्या जातील जेणेकरून सुधारणांवर लक्ष ठेवता येईल.
BSNL चा फुल फॉर्म काय आहे?
भारत संचार निगम लिमिटेड
BSNL सरकारी कंपनी आहे की खाजगी?
सरकारी
BSNL चे अॅक्टिव्ह युजर्स किती आहेत?
57.10 मिलीयन