Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Scam: इन्स्टाग्रामवरील ‘जिन्न’च्या नावाखाली फसवणूक! मुंबईच्या तरुणीला १५ लाखांहून अधिक रुपयांचा चुना

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. मुंबई सायबर सेलने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 20, 2026 | 03:23 PM
Cyber Crime, Mumbai Police, Sion News, Instagram Scam, Online Fraud, C

Cyber Crime, Mumbai Police, Sion News, Instagram Scam, Online Fraud, C

Follow Us
Follow Us:
  • ऑब्सेशन हीलर’च्या जाळ्यात सायनची तरुणी अडकली
  • व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरून फसवणुकीचा नवा फंडा
  • सोशल मीडियावरील ‘पॉवरफुल हीलर’च्या जाहिरातींना बळी पडू नका- सायबर सेलचा इशारा
मुंबईच्या सायन परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका २२ वर्षीय तरुणीला ‘पॉवरफुल ऑब्सेशन हीलर’ (Powerful Obsession Healer) नावाच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून जाळ्यात ओढण्यात आले. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील समस्या सोडवण्याचा दावा करणाऱ्या या पोस्टमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर पीडित महिला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून वाहिद ऊर्फ साहिल नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली.

अडीच वर्षे सुरू होता लुटीचा प्रकार

आरोपीने सुरुवातीला महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर आपल्याकडे ‘जिन्न’ व ‘तांत्रिक शक्ती’ असल्याचे सांगून तिला विविध विधी करण्याचा सल्ला दिला. जिन्न सर्व इच्छा पूर्ण करेल, असे आमिष त्याने दाखवले होते. मात्र, कालांतराने त्याने पीडितेच्या मनात भीती निर्माण करण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास विधी अपूर्ण राहील किंवा दुष्ट शक्तींमुळे इजा होईल, अशी धमकी देऊन त्याने अडीच वर्षांत सुमारे १५,९३,९८० रुपये उकळले.

Mumbai Press Club: मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी, एका ईमेलमुळे मोठी खळबळ

सायबर सेलकडून तपास सुरू

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. मुंबई सायबर सेलने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. सोशल मीडियावरील अशा फसव्या जाहिरातींपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सोने विकूनही तिने पैसे दिले

सुरुवातीला, आरोपीने फक्त २५,००० रुपये मागितले. त्यानंतर, तो वेगवेगळ्या बहाण्यांनी पैशांची मागणी करू लागला. कधी विधी अपूर्ण आहे असे सांगून, कधी नकारात्मक ऊर्जा दूर करायची आहे असे सांगून, आणि कधी जिन्न रागावला आहे असे सांगून त्यांनी वारंवार तरुणीकडून पैसे उकळले. त्यानंतरही भीती आणि विश्वास यांच्या कात्रीत सापडलेली ती तरुणी पैसे पाठवत राहिली. तिने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले. या खात्यांमध्ये सुमरा मोहम्मद, मोसिन सलीम आणि गुलनाज यांसारखी नावे वापरली होती.

Rupali Thombare Patil Post: ‘बजाव ताली… चाकणकर फरार!’ रुपाली ठोंबरेंच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

या फसवणुकीचा सर्वात धक्कादायक बाब म्हणजे,  तरुणीने तिच्या घरातील सोने विकूनही ते पैसे फसवणूक करणाऱ्यांना दिले होते. जेव्हा अडीच वर्षे पैसे देऊनही काहीच फायदा झाला नाही आणि मागण्या वाढतच गेल्या, तेव्हा तिला संशय आला. अखेरीस, तिने सायबर क्राईम हेल्पलाईन १९३० वर तक्रार दाखल केली.

संघटित टोळीचा संशय, तपास सुरू

तक्रारीनंतर, सायबर सेलने इंस्टाग्राम आयडी, मोबाईल नंबर आणि बँक खात्यांची चौकशी सुरू केली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली सोशल मीडियाद्वारे लोकांना लक्ष्य करणाऱ्या एका मोठ्या आणि संघटित सायबर फसवणूक टोळीचे हे कृत्य असू शकते, असा पोलिसांना संशय आहे.

 

 

Web Title: Mumbai cyber fraud 22 year old woman duped of 16 lakh by fake instagram healer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Cyber Fraud
  • cyber scam
  • Mumbai crime news

संबंधित बातम्या

Parenting tips: लाईक्स-व्ह्यूजच्या नादात मुलांचे फोटो धोक्यात? सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी व्हा सावध
1

Parenting tips: लाईक्स-व्ह्यूजच्या नादात मुलांचे फोटो धोक्यात? सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी व्हा सावध

Black Magic Scam:”दहा वर्षे घरात सुरू होती अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा खेळ!”ज्येष्ठ दाम्पत्याचे ६ कोटींहून अधिक संपत्तीची लुट!
2

Black Magic Scam:”दहा वर्षे घरात सुरू होती अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा खेळ!”ज्येष्ठ दाम्पत्याचे ६ कोटींहून अधिक संपत्तीची लुट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.