
Are children’s photos at risk in the pursuit of likes and views?( फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मुलंही आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचा निरागस आणि खोडकरपणा पाहून एक वेगळाच आनंद मिळतो. अशा सुंदर क्षणांची जपणूक करण्यासाठी पालक अनेकदा त्यांच्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. तुमच्या आयुष्यातील क्षण किंवा मुलांचे फोटो किंवा व्हिडिओ ऑनलाइन शेअर करणे कितपत सुरक्षित आहे? जाणून घ्या…
मुलांचे बालपण ही अशी स्थिती असते, जेव्हा मुलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मोठी होत असतात. ते गोष्टी समजून घेण्याची आणि स्वतःशी जोडण्याची क्षमता विकसित करतात. अशा वेळी, त्यांचे फोटो किंवा रील शेअर केल्याने त्यांच्या प्राइव्हसीपासून त्यांच्या वागण्यापर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. मुलांशी संबंधित चुकीचा मजकूर पोस्ट करणे इंटरनेटच्या जगात धोकादायक ठरू शकते.
मुलांचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना पालकांनी सावध राहणे आवश्यक आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने त्यांच्या भविष्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही धोक्यांबद्दल जाणून घेऊया.
मुलांचे भविष्य – इंटरनेटवर काहीही पोस्ट केल्यानंतर, ते काढून टाकणे खूप कठीण आहे. लोक ऑनलाइन शेअर केलेल्या गोष्टींचे स्क्रीनशॉट घेतात. लहान मुलांचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर करताना या फोटो-व्हिडिओतील मूल मोठं झाल्यावर त्याच्यावर किती परिणाम होऊ शकतो याचा नक्कीच विचार करा. याचा मुलाच्या भविष्यावर विपरीत परिणाम होणार नाही का?
इंटरनेटवर चुकीच्या ठिकाणी व्हायरल होणे – तुमच्या मुलाचे ऑनलाइन किडनॅपिंग होऊ शकते, म्हणजेच फक्त मुलाचे फोटो आणि व्हिडिओ दुसऱ्या नावाने आणि ओळखीसह वापरले जाऊ शकतात. अनेक वेळा असे देखील घडते, जेव्हा काही लोक ऑनलाइन इतर लोकांच्या मुलांना स्वतःचे म्हणून दावा करतात.
सायबर बुलिंग – मुलांचे किंवा तुमचे फोटो ऑनलाइन शेअर करणे हा एक मोठा धोका आहे. मुलांना थेट सायबर बुलिंगचा सामना करावा लागतो, त्यामुळे त्याचा परिणामही मोठा आहे. फोटो किंवा व्हिडीओ पाहून मुलांना चिडवले जाते. नकारात्मक कमेंट्स ऑनलाइन केल्या जातात. या सर्व गोष्टींपासून मुलांना दूर ठेवणे खूप गरजेचे आहे.
अश्लील कंटेट – काही लोक चुकीच्या मार्गाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंचा फायदा घेतात. या पीडोफाइलना चाइल्ड पोर्नोग्राफीचे वेड आहे. असे लोक लहान मुलांचे फोटो आणि व्हिडीओ एडिट करून आक्षेपार्ह वेबसाईट्स किंवा फोरमवर पोस्ट करतात.
इन्स्टाग्राम, फेसबुक, इतर साईटवर शेअर करताना सावधगिरी बाळगा
तुमच्या मुलांचे किंवा तुमचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर शेअर करताना तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. ऑनलाइन धमक्या पाहता मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना नेहमी सतर्क राहा.
Ans: सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. फोटो अनोळखी व्यक्तींपर्यंत पोहोचू शकतात किंवा त्यांचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे मुलांची ओळख उघड करणारे फोटो आणि वैयक्तिक माहिती सार्वजनिकपणे शेअर करणे टाळावे.
Ans: मुलांचे फोटो किंवा व्हिडीओ अनधिकृतपणे वापरले जाणे, बनावट अकाउंट तयार करणे, सायबर बुलिंग आणि आक्षेपार्ह कंटेंटमध्ये फोटोचा गैरवापर होणे असे धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी फोटो शेअर करण्यापूर्वी त्याचा संभाव्य परिणाम विचारात घ्यावा.
Ans: अकाउंटची प्रायव्हसी सेटिंग तपासा, फोटो केवळ विश्वासू व्यक्तींपर्यंत मर्यादित ठेवा आणि मुलांचे पूर्ण नाव, शाळेचे नाव, घराचा पत्ता किंवा नियमित ठिकाणांची माहिती शेअर करू नका. मुलांचे आंघोळ करतानाचे किंवा अतिवैयक्तिक क्षणांतील फोटो पोस्ट करणे टाळा.