मुंबई: मुंबईतील ड्रग्ज प्रकरणे अनेकदा मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय असतात, आणि त्यात अनेकवेळा बॉलीवूड, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे, आणि मनोरंजन उद्योगाचा समावेश असतो. गेल्या काही महिन्यात या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढहीहोत आहे. महाराष्ट्राच्या उडता पंजाब झालाय की काय, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. अशातच मुंबईतून पुन्हा ड्रग्जचे प्रकरण समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे साकीनाका पोलिसांनी वसईतील एका सिमेंट कंपनीत छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी ४ किलो ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत ८ कोटी रुपये इतकी आहे. याचवेळी साकीनाका पोलिसांनी कारवाई करत तीन संशयितांनाही ताब्यात घेतले. सादिक शेख, सिराज पंजवानी आणि सय्यद इराणी अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहे. तर मुख्य आरोपी अजूनही फरार असल्याचे सांगितले जात आहे आणि पोलिस त्याचा शोध घेतला जात आहे.
रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, युट्यूबरला मिळणार पासपोर्ट…
या छाप्याबद्दल माहिती देताना पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ म्हणाले की, “२४ एप्रिल २०२५ रोजी साकीनाका पोलिस ठाण्याला एका व्यक्तीकडून ड्रग्ज विकण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळाली. संशयिताला अटक केल्यानंतर, सुमारे १० लाख रुपये किमतीचे ५३ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. चौकशीनंतर, वसई येथील एमके ग्रीन कारखान्यावर छापा टाकण्यात आला, जिथे सुमारे ४ किलो एमडी ड्रग्ज, दोन रेफ्रिजरेटर आणि ड्रग्ज उत्पादनासाठी वापरले जाणारे एक सेंट्रीफ्यूगल मशीन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या ड्रग्जची एकूण किंमत सुमारे ८.०४ कोटी रुपये आहे.”
यापूर्वी, महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरजवळ सुमारे दोन महिन्यांपूर्वी ड्रग्ज जप्त केल्याची घटना समोर आली होती. ड्रग्ज जप्ती प्रकरणात पोलिसांनी तुळजापूर येथून १४ जणांना अटक केली होती, तर आरोपींची संख्या ३५ होती. १४ फेब्रुवारी रोजी धाराशिव पोलिसांनी सोलापूर-तुळजापूर रोडवरील तामलवाडी चेकपोस्टजवळ तपासणी दरम्यान अडीच लाख रुपये किमतीचे ड्रग्ज मेफेड्रोन जप्त केले होते. ड्रग्जची ही खेप तुळजापूरला जात होती.
बार्शीतल्या ड्रग्स प्रकरणात नवनवे धागेदोरे उलगडू लागले आहेत. यापूर्वी याच प्रकरणात ९ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. यात मस्तान शेख, साजिद मुजावर आणि शेळके या तीन जणांचा आरोपी म्हणून सहभागी करण्यात आले आहे. पण अद्याप हे तिघेही फरार आहेत. गेल्या आठवड्यात (18 एप्रिल) बार्शीत 20 ग्राम एमडी ड्रग्ससह पोलीसांनी तिघांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.