
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
दादर: दादर रेल्वे स्थानकावरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रवाशाने अचानक स्वतःवर धारदार चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी स्थानकावर सेवेवर असलेल्या होमगार्डने तत्परतेने धाव घेत त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. मात्र, त्यानंतरही त्या प्रवाशाने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी घेण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन होमगार्ड संबंधित प्रवाशाला जोराने पकडून समजावून सांगत आहे. याच दरम्यान दादर स्थानकावर एक एक्सप्रेस ट्रेन येतांना दिसत आहे. ते पाहून संबंधित प्रवाशी ट्रेनच्या दिशेने धाव घेतो. मात्र होमगार्ड राहुल सरोज यांनी त्याचा पाठलाग करून त्याला वेळीच पकडलं. यावेळी तो प्रवासी हिसके देऊन स्वत:ची सुटका करून घेण्याचा जोरदार प्रयत्न करत होता. मात्र सरोज यांनी त्याला घाट पकडून त्याचा जीव वाचवला.
एका प्रवाशाने अचानक स्वतःवरच धारदार चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी स्थानकावर सेवेवर असलेल्या होमगार्डने तत्परतेने धाव घेत त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. #dadar #railway #CCTV pic.twitter.com/MDs36mTKzN — Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) October 28, 2025
परिसरात खळबळ
हा प्रकार दादरच्या फलाट क्रमांक १२ वरती घडला आहे. या घटनेन परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. त्या प्रवाशाने आपलं जीवन संपवण्याचा असा प्रयत्न का केला? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
भिवंडीत अमानुष कृत्य! 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या
भिवंडीत एक संतापजनक आणि धक्कदायक घटना घडली आहे. एका ६५ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. शेतावर कामासाठी गेलेल्या महिलेला अज्ञात आरोपीने अत्याचार करून डोक्यात दगड घालून निर्घृणपणे ठार मारल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भवंडी तालुक्यातील चावेभरे गावच्या हद्दीत घडली आहे.
अंगावरील सोने जशाच तसे
६५ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर शारीरिक अत्याचार करून तिला दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. हा प्रकार कुटुंबायांना समजल्यानंतर कुटुंबीयांनी शेतावर धाव घेतली. त्यावेळेस वृद्ध महिलाही निपचित पडली होती. ही बाब स्थानिक गणेशपुरी पोलिसांना कळवण्यात आली. गणेशपुरी पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय या ठिकाणी घेऊन आले. विशेष म्हणजे ही हत्या केल्यानंतर महिलेच्या गळ्यामध्ये असलेले सुमारे पाच ते सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हे चोरीला गेले नव्हते. म्हणून ही हत्या चोरीच्या उद्देशाने नसून त्या महिलेवर अत्याचार करून ओळख लपविण्यासाठी केला असल्याचा आरोप कुटुंबायांनी केला आहे.
फटाके फोडत असतानाच तरुणावर गुंडाने केला चाकू हल्ला; पोटावर सपासप वार केले अन्…