Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: रीलच्या नादात जीव गेला! सोलापुरातील सिद्धेश्वर तलावात १६ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

सोलापुरातील सिद्धेश्वर तलावात सोशल मीडियासाठी रील बनवताना १६ वर्षीय सुरंजन शेंडगे पाण्यात बुडाला. मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र अपयश आले. घटनेनंतर शोधमोहीम सुरू असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 02, 2026 | 01:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• सिद्धेश्वर तलावात रील शूट करताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
• मित्र शूटिंग करत असताना उडी; पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना
• अग्निशमन दल व पोलिसांची शोधमोहीम; परिसरात शोककळा

सोलापुर: सोलापूर परिसरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोशल मीडियासाठी रील्स बनवण्याच्या नादात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तरुणाचे नाव सुरंजन शेंडगे असे आहे. तो मूळचा फलटण येथील रहिवासी आहे. सुरंजन आपल्या मित्रांसोबत सिद्धेश्वर तलावात फिरण्यासाठी गेला होता. त्या दरम्यान ही घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी सिद्धेश्वर तलावात घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Crime News : मावळात निवडणूक विभाग सतर्क! नाकाबंदीत सात लाखांची देशी दारू जप्त, एकास अटक

काय घडलं नेमकं?

सुरंजन हा आपल्या बेलेराव आणि माळवदकर या दोन मित्रांसह तलावात पोहण्यासाठी गेला होता. गणपती घाटावरून त्याने पाण्यात उडी मारली आणि त्याचे मित्र मोबाईलवर शूटिंग करत होते. मात्र, पाण्यात उडी मारल्यानंतर अचानक नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे सुरंजन गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी बेलेरावने पाण्यात उडी मारली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो स्वतःही बुडू लागला.

हे पाहून माळवदकर याने आरडाओरडा केला, तेव्हा एका होडी चालकाने प्रसंगावधान राखत बेलेराव याचे प्राण वाचवले. दुर्दैवाने, सुरंजन पाण्याचा मध्यभागी असल्याने तो खोलवर बुडाला होता. त्याला वाचवता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सलग अडीच तास शोध मोहीम राबवूनही सुरंजनचा पत्ता लागला नाही. रात्री अंधार झाल्यामुळे शोधकार्य तात्पुरते थांबवण्यात आले असून, सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

एकुलता एक मुलगा

सुरंजन हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि तो सोलापुरात डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. तो आपल्या चुलत मावस भावाकडे राहून आपले भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहत होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सिध्देश्वर तलावात असं काय होतं, ज्यामुळे पोहण्यात तरबेज असणारे दोघंही बुडाले, असा सवाल विचारला जातोय.

Beed Crime: ‘त्या’ घटनेचा उलगडा, आईकडून चिमुकल्याला विहिरीत ढकललं, नंतर स्वतः…; कारण काय?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सोलापुरातील प्रसिद्ध सिद्धेश्वर तलावात.

  • Que: मृत तरुण कोण होता?

    Ans: सुरंजन शेंडगे (वय १६), मूळचा फलटण येथील रहिवासी.

  • Que: नेमकं कारण काय?

    Ans: सोशल मीडियासाठी रील शूट करताना पाण्यात उडी घेतली आणि बुडाला.

Web Title: Solapur crime life lost in the pursuit of making a reel a 16 year old student drowned in siddheshwar lake in solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
1

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
3

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.