Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Police: गुन्हेगारांना वठणीवर आणणारेच हतबल! महिला कॉन्स्टेबलच्या कथित दहशतीने मुंबई पोलीस दलात खळबळ

Mumbai Police: वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या बदलीनंतर ठाण्याच्या आवारात कथित फटाके फोडून आनंद साजरा? बड्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा धाक अन् खोट्या तक्रारींची भीती? मुंबई पोलीस दलातील या खळबळजनक चर्चेमागील सत्य काय?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 20, 2026 | 12:24 PM
Mumbai Police: गुन्हेगारांना वठणीवर आणणारेच हतबल! महिला कॉन्स्टेबलच्या कथित दहशतीने मुंबई पोलीस दलात खळबळ

Mumbai Police: गुन्हेगारांना वठणीवर आणणारेच हतबल! महिला कॉन्स्टेबलच्या कथित दहशतीने मुंबई पोलीस दलात खळबळ

Follow Us
Follow Us:
  • वरिष्ठ निरीक्षकाच्या बदलीनंतर महिला कॉन्स्टेबलचे ठाण्यात कथित ‘ट्रान्सफर सेलिब्रेशन’
  • बड्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा धाक आणि खोट्या तक्रारींची भीती दाखवून दमदाटी
  • कर्मचाऱ्यांमध्ये हतबलता; वरिष्ठ पातळीवरील कारवाईकडे लक्ष
Mumbai Police: भल्या-भल्या गुन्हेगारांच्या मनात धाक निर्माण करणाऱ्या मुंबई पोलीस दलात सध्या एका वेगळ्याच विषयावरून जोरदार चर्चा रंगली आहे. पश्चिम उपनगरातील एका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबलने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदलीनंतर केलेले कथित ‘ट्रान्सफर सेलिब्रेशन’ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. बदलीचा आदेश समोर आल्यानंतर ठाण्याच्या आवारात फटाके फोडून आनंद साजरा केल्याची चर्चा दलात सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Samruddhi Mahamarg: शासकीय वाहनावर अज्ञातांची दगडफेक; ‘११२’ वर तीन वेळा कॉल करूनही २ तास मदत नाही, सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

वरिष्ठ निरीक्षकाच्या बदलीमागे तक्रारीचा संदर्भ?

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरातील एका महत्त्वाच्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आली आहे. ही बदली प्रशासकीय कारणास्तव झाल्याचे सांगितले जात असले, तरी यामागे संबंधित महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीचा संदर्भ जोडला जात आहे. आदेश बाहेर येताच मंगळवारी ठाण्याच्या परिसरात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

बड्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा धाक आणि खोट्या तक्रारींची भीती?

संबंधित महिला कॉन्स्टेबलचा पती पोलीस दलातील बडा अधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्याच आधारे ती पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करत असल्याची माहिती समोर येत आहे. ड्युटीदरम्यान कामात चुकारपणा करणे आणि कोणी जाब विचारल्यास किंवा काम सांगितल्यास खोट्या तक्रारी करून बदनामी व मानसिक त्रास देण्याची भीती दाखवली जात असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.

हेही वाचा:Murder case Update: मित्रावर संशय, पण मास्टरमाइंड निघाली पत्नी! कारच्या जीपीएसवरून लोकेशन हेरले अन् जंगलात…

मॉडेलिंगची ओढ अन् हतबलता; कारवाईकडे लक्ष

कर्तव्यापेक्षा तिला मॉडेलिंग आणि ग्लॅमरची अधिक ओढ असल्याचीही पोलीस दलात चर्चा आहे. पतीच बडा अधिकारी असल्यामुळे या महिला पोलिसाची तक्रार कुठे करायची, अशी हतबलता काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्याचे बोलले जाते. यापूर्वीही काही अधिकाऱ्यांना अशाच तक्रारींचा सामना करावा लागल्याची उदाहरणे चर्चिली जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या कथित ओळखींचा वापर करून दबाव आणला जात असल्याच्या कुजबुजीनंतर, आता वरिष्ठ पातळीवरून नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबई पोलीस दलात नेमकी कोणती घटना चर्चेत आली आहे?

    Ans: पश्चिम उपनगरातील एका पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या बदलीनंतर संबंधित महिला पोलीस कॉन्स्टेबलने ठाण्याच्या परिसरात फटाके फोडून कथित 'ट्रान्सफर सेलिब्रेशन' केल्याची चर्चा रंगली आहे

  • Que: संबंधित महिला कॉन्स्टेबलबाबत कोणते आरोप केले जात आहेत?

    Ans: पती पोलीस दलातील बडा अधिकारी असल्याचा आणि वरिष्ठांशी ओळखी असल्याचा धाक दाखवून ती दमदाटी करत असल्याचा, कामात चुकारपणा करून काम सांगितल्यास खोट्या तक्रारींची भीती दाखवली जात असल्याचा आरोप सूत्रांकडून केला जात आहे.

  • Que: या प्रकरणाचा पुढील टप्पा काय आहे?

    Ans: या कथित प्रकारामुळे दलात चर्चा व हतबलतेची भावना निर्माण झाली असून, वरिष्ठ पातळीवरून तिच्या वर्तनावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mumbai police woman constable transfer celebration senior inspector sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • celebretion news
  • Mumbai Police
  • Mumbai Police news
  • Police Transfer
  • woman

संबंधित बातम्या

Mumbai local Train: विनातिकीट प्रवाशाच्या रागाचा फटका भलत्याच निरपराध नागरिकाला; मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
1

Mumbai local Train: विनातिकीट प्रवाशाच्या रागाचा फटका भलत्याच निरपराध नागरिकाला; मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Naigaon Railway Station: लोकलमधील वाद जीवावर बेतला! छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकलले; आरोपीला अटक
2

Naigaon Railway Station: लोकलमधील वाद जीवावर बेतला! छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकलले; आरोपीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.