Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai local Train: विनातिकीट प्रवाशाच्या रागाचा फटका भलत्याच निरपराध नागरिकाला; मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Mumbai local Train: वाद दोघांमध्ये, पण वार भलत्याच निष्पाप प्रवाशावर! लोकल ट्रेनमधील किरकोळ वादातून फेकलेला चाकू थेट छातीत शिरल्याने उडाली खळबळ... वांद्रे रेल्वे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 17, 2026 | 12:50 PM
Mumbai local Train: विनातिकीट प्रवाशाच्या रागाचा फटका भलत्याच निरपराध नागरिकाला; मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Mumbai local Train: विनातिकीट प्रवाशाच्या रागाचा फटका भलत्याच निरपराध नागरिकाला; मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Follow Us
Follow Us:
  • प्रवाशांमधील वादातून धारदार चाकू दरवाजाजवळील निष्पाप प्रवाशाच्या छातीत शिरला
  • ५३ वर्षीय सुरेश शर्मा असे जखमी प्रवाशाचे नाव असून, रविवारी दुपारी घटना घडली
  • प्रवाशांच्या सतर्कतेमुळेआरपीएफ जवानांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले
Mumbai local Train: मागील काही महिन्यांपासून मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमधील वाद आणि हाणामारीचे प्रकार सातत्याने वाढत असून आता हे वाद जीवघेणे ठरत आहेत. दोन प्रवाशांमधील किरकोळ वादाचा फटका एका भलत्याच निष्पाप प्रवाशाला बसल्याची अत्यंत संतापजनक आणि थरारक घटना समोर आली आहे. दोन प्रवाशांमधील वादातून संतापाच्या भरात फेकलेला चाकू लक्ष्य चुकल्याने अन्य एका निरपराध प्रवाशाच्या छातीत घुसल्याची घटना घडली असून, या हल्ल्यात प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

हेही वाचा: Uttarakhand Bus Accident: मृत्यूचे तांडव! ३० ते ३५ प्रवाशांनी भरलेली बस थेट १०० मीटर खोल पाण्यात कोसळली; भीषण अपघातांत १२ जणांचा..

नेमकी काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, धारावीत राहणारे ५३ वर्षीय सुरेश शर्मा हे रविवारी कामानिमित्त बोरिवली येथे गेले होते. तिथून परतत असताना ते विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलने प्रवास करत होते. लोकल अंधेरी स्थानकातून पुढे निघाल्यानंतर त्यांच्या पाठीमागच्या सीटवर बसलेले दोन प्रवासी आपापसात कोणत्यातरी कारणावरून वाद घालू लागले. हा वाद विकोपाला जाऊन त्यांच्यात शिवीगाळ आणि हाणामारी सुरू झाली. दुपारी १२:१२ वाजता लोकल अंधेरी स्थानकात थांबली असता, त्यातील एक प्रवासी फलाटावर उतरला, तर दुसरा प्रवासी डब्यातच उभा राहिला.

ट्रेन अंधेरी स्थानकातून पुढे निघताच, फलाटावर उभ्या असलेल्या त्या तरुणाने संतापाच्या भरात डब्यात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या दिशेने एक धारदार चाकू फेकला. मात्र, निशाणा चुकल्याने तो जीवघेणा चाकू दरवाजाजवळ उभे असलेल्या ५३ वर्षीय सुरेश शर्मा यांच्या छातीच्या उजव्या भागात जाऊन घुसला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे डब्यात एकच खळबळ उडाली आणि शर्मा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले.

हेही वाचा: Suspicious Death: “चार विहिरींचे पाणी उपसले अन् हाती लागला मृत्यूचा सर्वात मोठा पुरावा!”दौलतबाबा मृत्यू प्रकरणात धक्कादायक सत्य?

आरपीएफची तत्परता आणि रुग्णालयात दाखल

ही लोकल दुपारी १२:२१ वाजता साखळी ओढल्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ वर थांबवण्यात आली. यावेळी रेल्वे सुरक्षा दल (RPF) जवानांनी तपासणी केली असता, सुरेश शर्मा यांच्या छातीतून रक्तस्राव होत असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे निरीक्षक आर. के. शर्मा आणि उपनिरीक्षक अरुण कुमार पांडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी शर्मा यांना बांद्रा स्थानक व्यवस्थापकाच्या कार्यालयात प्राथमिक उपचार देण्यात आले आणि त्यानंतर तातडीने बांद्रा येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाने दिली आहे.

दरम्यान, चाकू फेकून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवा गायकवाड (२५) या मुख्य आरोपीला रेल्वे पोलिसांनी तत्परतेने ताब्यात घेतले असून, तो विनातिकीट असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील कायदेशीर तзеपासासाठी हा गुन्हा अंधेरी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा भीषण प्रकार कोणत्या लोकलमध्ये घडला?

    Ans: विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमध्ये हा प्रकार घडला.

  • Que: जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव काय आहे आणि तो कोठे राहतो?

    Ans: जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव सुरेश शर्मा (वय ५३) असून ते धारावीत राहतात

  • Que: पोलिसांनी या प्रकरणी कोणती कारवाई केली आहे?

    Ans: आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिवा गायकवाड याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास अंधेरी रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

Web Title: Mumbai local train fight andheri bandra stabbing innocent passenger injured sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Mumbai Crime case
  • Mumbai local train
  • Mumbai Local Update
  • Mumbai Police news
  • RPF

संबंधित बातम्या

Mumbai News ; मुंबईत भोजपुरी गाण्यांचा वाद पेटला! भोजपुरी गाणी वाजवण्यामागचं कारण काय? रेल्वेचं अजब स्पष्टीकरण
1

Mumbai News ; मुंबईत भोजपुरी गाण्यांचा वाद पेटला! भोजपुरी गाणी वाजवण्यामागचं कारण काय? रेल्वेचं अजब स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.