crime (फोटो सौजन्य: social media)
मुंबईतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने तिच्या प्रियकरासह मिळून तिच्या पतीला अमानुष मारहाण करून हत्या केल्याचं समोर आलं आहे. मृत पती हा व्यवसायाने फिल्म सिटीमध्ये मेकअप आर्टिस्ट आहे. हत्या झालेल्याव्यक्तीचे नाव भरत अहिरे (४० वर्षीय) आहे. ही घटना आरे कॉलनीतील छोटा काश्मीर गार्डन परिसर येथे घडली आहे. भरत अहिरे आणि त्याची पत्नी राजश्री तिचा प्रियकर याने मिळून भरतचा जीव घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलैला रात्री भरतची पत्नी राजश्रीने तिचा प्रियकर चंद्रशेकर आणि त्याचा भाऊ रंगा या दोघांना फोन केला आणि बोलावून घेतलं. तिथे त्यांनी भरतला मारायचा कट रचला. भरतची १२ वर्षांची मुलगी श्रेयाने पोलिसांना या घटनेनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. श्रेयाने सांगितले की, आईने बाबांना शौचालयाजवळ बोलावले, जिथे तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगाने भरतला लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत वडिलांच्या पोटातील नस तुटली, छातीची हाडे तुटली आणि यकृताचे खूप नुकसान झाले. असं तिने सांगितले आहे.
अर्धमेल्या अवस्थेत तीन दिवस ठेवल लपवून
या घटनेनंतर राजश्रीने अर्धमेल्या अवस्थेत भरतला धमकी देत होती, की जर त्याने कोणाला सांगितले तर ती मुलांनाही मारून टाकेल. त्याला तीन दिवस घरात लपवून ठेवण्यात आले आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले नाही. जेव्हा भरतची प्रकृती बिघडली तेव्हा १६ जुलै रोजी भरतला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पाच ऑपरेशन्स करण्यात आले. परंतु भरतचे प्राण वाचू शकले नाही. ५ ऑगस्ट रोजी सकाळी भरतचा मृत्यू झाला.
राजश्रीला अटक
मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीत राहणाऱ्या राजश्री अहिरे (35) हिचा तिचा पती भरत लक्ष्मण अहिरे याच्याशी बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. महिलेच्या दोन मुली आणि 3 वर्षांचा मुलगा महिलेच्या क्रूरतेचे साक्षीदार बनले. त्यांनी नातेवाईकांना वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली. नातेवाईक तिथे पोहोचले तेव्हा राजश्रीने सांगितले की भरत दुचाकी अपघातात जखमी झाला आहे, परंतु पोलिसांना राजश्रीच्या दाव्यावर शंका आली. पोलिसांनी मुलांशी याबाबत संवाद साधला तेव्हा सत्य बाहेर आले. भरतचा मृत्यू 5 ऑगस्ट रोजी झाला. पोलिसांनी ३५ वर्षीय राजश्रीला हत्येचा कट रचल्याच्या आणि जाणून बुजून तिच्या पतीला मरू दिल्याच्या आरोपाखाली अटक केली असून प्रियकराच्या भावाला अटक केली आहे. तर महिलेचा प्रियकर चंद्रशेखर अजूनही फरार आहे.
Jalgaon Crime: जळगावमध्ये २१ वर्षीय तरुणाची टोळक्याकडून निर्घृण हत्या;आई-वडिलांनाही बेदम मारहाण