जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रेयसीने लग्नासाठी नकार दिल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव गौरव बोरसे असे आहे. हा तरुण जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गंधाली गावातील रहिवासी आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आत्महत्या करण्याचे कारण सांगितले आहे. ही घटना ७ ऑगस्ट रोजी घडली आहे.
पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला; पोटातच चाकू खुपसला अन् तरुण…
व्हिडिओत काय?
आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर्ती एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने ‘मी एका तरुणीसोबत चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही लग्नही केले होते. पण त्यावेळी आमचे दोघांचे वय कमी होते. आता मात्र त्या तरुणीने लग्नासाठी नकार दिला आहे, तू मला विसरून जा’ असं ती मला सांगत आहे. ‘चार वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ती मला विसरून जा. असं कसं सांगू शकते तू’? असा सवाल देखील या तरुणाने व्हिडिओ पोस्ट करत विचारला आहे.
पुढे तो म्हणतो की, ‘आई तू माझ्या मृत्यूनंतर जास्त रडू नको, मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही. वडील खूप गरीब आहेत, त्यांना त्रास देऊ नकोस, त्यांना पण सांग, जास्त रडू नका. प्रेमात मी खूप दुःखी आहे म्हणून मी हा निर्णय घेत आहे. तुम्ही हा निर्णय घेऊ नका माझे वडील खूप गरीब माणूस आहे. प्रेमामध्ये चुकीचा निर्णय मित्रांनो घेऊ नका. जो आज मी प्रेमामध्ये चुकीचा निर्णय घेत आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मित्रांनो मला माफ करा. मला प्रेमात खूप त्रास होत आहे, म्हणून मी हा निर्णय घेत आहे’, असं त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
इंस्टाग्रामवर त्याने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. गौरवने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ठेकेदाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे.चंदर पिराजी माेहिते (वय ५६, रा. विनय सागर आर्केड, त्रिमूर्ती चौकाजवळ) असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत मोहिते यांची पत्नी शकुंतला (वय ५६) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बांधकाम व्यावसायिक संतोष चोरगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.