crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा दीर्घकाळचा साथीदार असलेला कुख्यात गुंड डी.के.राव (५९) याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून ही कारवाई केली आहे. एका गुंतवणूकदाराला खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी डिके राव सह विकासक मिमित भुता आणि अनिल परेराव या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्याच्या सोबतच्या आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डिके राव सह त्याच्या त्याच्या साथीतदारांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
तू मला खूप आवडते, मी तुला नोकरी लावतो अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार
१ कोटीची फसवणूक आणि धमकवण्याचा प्रयत्न
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका बिल्डरने गुंतवणूकदारांची अंदाजे १ कोटीची फसवणूक केल्यानंतर, गुंतवणूकदार पैसे मागू लागल्यावर त्यांनी डीके रावला त्यांना धमकवण्यास सांगितले होते. गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही विकासकांनी गुंतवणूकदारांची १ कोटी फसवणूक केली होती. गुंतवणूकदार पैसे मागू लागल्यावर विकासकांनी डीके रावची मदत घेऊन त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला.” ही घटना मागील वर्षीची असूनही, गुन्हा नुकताच नोंदवला गेला. याच गुन्ह्यात डीकसह दोन्ही विकासकांना अटक केली आहे.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीके रावसारखे जुने गुंड अजूनही रिअल इस्टेट वादांमध्ये ‘मसल पॉवर’ म्हणून वापरले जात आहेत, हे या अटकेतून स्पष्ट होते. अधिक तपास मुंबई पोलिसांचे खंडणी विरोधीपथकाचे पोलिस करत आहे.
गुन्हेगारी कारकीर्द काय?
धारावीचा रहिवासी रवी मल्लेश बोऱ्हा उर्फ डीके राव (५९) हा कुख्यात गुंड आहे. तो अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा दीर्घकाळचा साथीदार होता. त्याने १९९० च्या दशकात किरकोळ चोरीपासून आपली गुन्हेगारी कारकीर्द सुरू केली होती. नंतर त्याने छोटा राजनच्या टोळीमध्ये प्रवेश केला. मुंबईत जबरदस्ती, खंडणी यासारख्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय झाला. पुढे त्याने स्वतःचे स्वतंत्र नेटवर्क तयार केले, परंतु राजनशी निष्ठा कायम ठेवली.
त्याच्यावर आतापर्यंत ४२ गुन्हे दाखल असून त्यात सहा खून, पाच दरोडे आणि अनेक खंडणीचे गुन्हे आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला होता. तो जामिनावर बाहेर होता. यावर्षी जानेवारीमध्ये देखील डीके रावला अटक करण्यात आली होती. त्याने अंधेरीतील एका हॉटेल व्यवसायिकाला धमकावून कमी किंमतीत मालमत्ता विकण्यास भाग पाडले होते. एप्रिल महिन्यात त्याला सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. आता पुन्हा एकदा त्याला अटक करण्यात आली आहे.
पुण्यात खळबळ! NDA मध्ये विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून केली आत्महत्या