औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून देवगिरी कॉलेजमधील विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्या शरणसिंग सेठी याला औरंगाबाद पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली असून त्याने दिलेल्या कबुलीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. प्रेमाच्या हट्टापायी शरणसिंग सेठी याने सुखप्रीत कौर ऊर्फ कशिश या विद्यार्थिनीची वार करून हत्या केली. त्यानंतर दुचाकी जागेवर ठेवूनच त्याने पळ काढला. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलिसांच्या मदतीने शरणसिंग सेठीला चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकण्यात आल्या(Murder of a young woman out of one sided love in Nashik; Accused arrested within 24 hours).
आरोपी शरणसिंग याने शनिवारी दुपारच्या वेळी कशीश महाविद्यालयात आल्यानंतर तीला बोलण्याचे निमित्त करुन बोलावून घेतले आणि तिच्याशी वादावादी झाल्यानंतर अधिक राग आल्यामुळे त्याने तिला कॅफेबाहेर २०० फूट अंतरावर असलेल्या मोकळ्या प्लॉटच्या दिशेने ओढथ नेले. माझी होऊ शकत नाहीस, तर इतर कुणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणत शस्त्राने तिच्यावर सतरा ते अठरा वार केले.
शरणसिंगने हत्या केल्यानंतर दुचाकी सोडून पळ काढला. रस्त्यावर कुणी पाहिल, या भीतीने दाट वस्ती, जंगलातून मार्ग काढत धुळे-सोलापूर हाय वेवर पोहोचला. तेथीन लिफ्ट मागून ट्रकमध्ये बसून नाशिकच्या दिशेने गेला. रविवारी सकाळी ११ वाजता लासलगावला पोहोचला. दरम्यान, शरणसिंगच्या बहिणीच्या घरावर पोलिसांची पाळत होती. शरणसिंग लासलगाव बहिणीच्या घरी आल्यानंतर त्याच्या भाऊजींनी तत्काळ गुन्हे शाखेच्या पथकाला कळवले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला औरंगाबादेत आणले गेले.
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, तो कशीशवर मागील पाच वर्षांपासून एकतर्फी प्रेम करीत होता. दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. तो दहावी नापास झाल्यानंतर गॅरेजवर कामाला होता तर कशीशने बारावी पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. महाविद्यालयात ती इतर सर्व मित्र-मैत्रिणींशी बोलायची, मात्र माझ्याशीच बोलत नाही, हा राग त्याच्या मनात होता.
[read_also content=”लग्नानंतर वधू-वराने स्वत:ला पेटवून घेतलं आणि…. पाहा भयानक व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/bride-and-groom-set-themselves-on-fire-nrvk-280519.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]






