Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणीचा छळ; पाठलाग, धमकी अन् घरात घुसून तरुणीवर…

पोलिस भरतीची तयारी करणारी २२ वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे धावण्याचा सराव करून घरी परतत होती. मात्र, तिचा गेल्या काही दिवसांपासून पाठलाग करणारा तरुण तिच्यामागे घरापर्यंत पोहोचला आणि वाद झाल्यानंतर तिच्यावर चाकूने हल्ला केला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 23, 2026 | 11:50 AM
Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणीचा छळ; पाठलाग, धमकी अन् घरात घुसून तरुणीवर...

Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणीचा छळ; पाठलाग, धमकी अन् घरात घुसून तरुणीवर...

Follow Us
Follow Us:
  • एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग
  • घरापर्यंत पोहोचून केला डोक्यात वार
  • आरोपीविरोधात गुन्हा; शोध सुरू
 

मुजफ्फरपूर: बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीचा छळ करून तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मोतीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. बिहार पोलिसांच्या शिपाई भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीने गावातील रवि कुमार या तरुणावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या १५ ते २० दिवसांपासून तो आपला पाठलाग करून बोलण्यासाठी दबाव आणत असल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले.

धावण्याच्या सरावावरून परतताना अडवले

तरुणी शारीरिक क्षमता चाचणीच्या तयारीसाठी नियमित धावण्याचा सराव करते. मंगळवारी धावण्याचा सराव करून ती घरी परतत असताना दरिया छपरा पोखर परिसरात रवि कुमारने तिला रस्त्यात अडवले. त्याने एकतर्फी प्रेमाचा दबाव टाकल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तिने विरोध केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. यावेळी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा: Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्… 

नागरिक आल्याने आरोपी निघून गेला

या प्रकारादरम्यान काही नागरिक घटनास्थळी पोहोचल्याने रवि तेथून निघून गेला. त्यानंतर तरुणी घरी पोहोचली. मात्र, रवि तिचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे. घराजवळ पुन्हा वाद झाला. यावेळी रविने चाकू काढून तरुणीच्या डोक्यावर वार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. हल्ल्यात तरुणी जखमी झाली.

आरडाओरड होताच आरोपी फरार

तरुणीने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी येऊ लागले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी तरुणीला उपचारासाठी मोतीपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिने मोतीपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कुटुंबीयांना धमकी दिल्याचाही आरोप

तक्रारीत तरुणीने आरोपीवर छेडछाड करण्यासोबतच बलात्काराची धमकी दिल्याचाही आरोप केला आहे. तसेच आरोपी तिच्या वडिलांना आणि भावाला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोपही तिने केला आहे. या सर्व आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

आरोपीच्या अटकेसाठी शोधमोहीम

मुजफ्फरपूरच्या पश्चिम विभागाच्या डीएसपी सुचित्रा कुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा आणि त्यानंतर घराजवळ येऊन पुन्हा मारहाण करून चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Muzaffarpur one sided love girl knife attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Bihar Crime News
  • Knife attack
  • One Sided Love

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.