
crime (फोटो सौजन्य: social media)
अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना नागपूरच्या शासकीय वैधकीय रुग्णालय तसेच काहींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
प्राथमिक तपासात अतिवेग, चालकाला डुलकी किंवा दृष्टीआड ट्रक उभा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नसून तपासानंतर अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी
भांडुप (पश्चिम) येथील स्टेशन रोडवर एक मोठा बस अपघात झाला. बेस्टच्या बसने अनेक लोकांना चिरडल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. हा अपघात सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास झाला. यातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून, याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिस उपायुक्त (डीसीपी) घटनास्थळी उपस्थित आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, भांडुपमधील स्टेशन रोडवर रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई पोलिस झोन ७ चे डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले की, अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले आहेत. आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (एमएफबी), स्थानिक पोलिस, बेस्ट बस कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा यांसह अनेक आपत्कालीन यंत्रणांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. सुरुवातीच्या अहवालात असे दिसून आले आहे की या घटनेत १० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींची नेमकी संख्या आणि अपघाताविषयी अधिक माहिती घेतली जात आहे.
Satara Crime : शिरवळमध्ये तरुणाची बेदम मारहाणीत हत्या; आरोपी अटकेत, शिरवळ बंदची हाक
Ans: नागपूर–वर्धा रोडवरील जुनापाणी गावाजवळ 30 डिसेंबर रोजी पहाटे.
Ans: या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला.
Ans: अतिवेग, चालकाला डुलकी किंवा रस्त्यावर उभा ट्रक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.