भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी
आमदार महेंद्र थोरवे काय म्हणाले नेमकं?
आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांशी बोलतांना खळबळजनक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मंगेशच्या परिवाराने अजून एक धक्कादायक बातमी सांगितलेली आहे. रवी देवकरचा जो बॉडिगार्ड आहे, त्या आरोपीने मंगेशवर जवळ जवळ 13 वार एकट्याने केले आहेत. जर आपण फुटेजमध्ये पाहिलं, तर रवी देवकरच्या एकट्या बॉडीगार्डने तेरा वार केले आहेत. तो बॉडीगार्ड वाल्मिक कराडचा साथीदार आहे. वाल्मिक कराडच्या पेजवर त्याचं नाव आहे. त्याच्या ग्रुपवर त्याचं नाव आहे. अशा पद्धतीने तो धनंजय मुंडे, गडावरचे पण फोटो आहेत. त्यासंबंधीत सर्व फोटो आम्हाला मिळालेले आहेत.याचा अर्थ तो बाहेरचा भैय्या नाही. तर तो बीडमधीलच गुन्हेगार आहे. तो तिथला वॉन्टेड असून रवी देवकराने त्याला ही हत्या करण्यासाठी आणलेलं होतं. हे सर्व राष्ट्रवादी कनेक्शन आहे”
आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला इशारा
“धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि आता हा रवी देवकरने आणलेला बॉडीगार्ड आहे, हा बीडचाच असल्याने मंगेशची क्रुरपणे हत्या करण्यात त्याचा सहभाग सर्वात मोठा आहे. अशा पद्धतीचं हे कृत्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे. सुनील तटकरेंनी कर्जतमध्ये येऊन त्यांना पाठबळ देण्याचं काम केलं आहे. त्यांनाच वाचवण्याचा प्रयत्न सुनील तटकरे करत आहेत. आमची पोलीस प्रशासनाला विनंती राहील की आपण त्या आरोपींना तात्काळ अटक करावी, नाहीतर उद्या कँडल मार्च झाल्यानंतर आम्ही सर्व पोलीस स्टेशनलाच बसून राहू”, असा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
रविंद्र परशुराम देवकर,दर्शन रविंद्र देवकर,धनेश रविंद्र देवकर,उर्मीला रविंद्र देवकर,विशाल सुभाष देशमुख,महेश शिवाजी धायतडक,सागर राजु मोरे, सचिन दयानंद खराडे, दिलीप हरिभाऊ पवार (उर्मिला देवकर यांचा भाऊ), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
Ans: 26 डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे.
Ans: एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Ans: शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी.






