
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
पीडित अल्पवयीन मुलींचा १४ वर्षांचा भाऊ हा घरातून पळून गेला आणि त्याने शेजार्यांकडे मदत मागितली. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने तात्काळ जवळपास राहणाऱ्या तृतीयपंथीयांच्या एका ग्रुपला या घटनेबद्दल माहिती दिली. तृतीयपंथीयांचा ग्रुप तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीच्या घरात प्रवेश केला. त्यांनी ९ वर्षाची एक मुलगी आणि १२ वर्षांची एक अश्या २ अल्पवयीन मुलींची सुटका केली. त्यांनी आरोपी बापाला मारहाण देखील केली आणि नंतर त्याला वाठोडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी वडिलांना तात्काळ अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पीडित मुलींना पुनर्वसन आणि समुपदेशनासाठी सरकारी निवारागृहात पाठवण्यात आले आहे. अत्याचारादरम्यान मुलींची आई आणि मोठा भाऊ हा तरुंगात आहे.
आई आणि मोठा भाऊ तरुंगात का ?
मुलींची आई आणि भाऊ सध्या तुरुंगात आहे. या मागचा कारण देखील खूप वेदनादायक आहे. चार मुलांची आई असलेल्या या ३५ वर्षीय महिलेने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घरगुती हिंसेतून सुटका मिळवण्यासाठी आपल्या चार मुलांसोबत दिल्लीतून नागपूरला पलायन केले होते. यावर्षी जून महिन्यात नागपूर जिल्ह्यातील कुही येथील एका बांधकाम साईटवर ती आणि तिच्या १७ वर्षांचा मोठा मुलगा कामावर जात होते. त्यावेळी कामाच्या आठव्याच दिवशी, मजूर ठेकेदार या महिलेला एका निर्जन ठिकाणी ओढत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिचा मुलगा तिच्या मदतीसाठी धावला. या झटापटीत ठेकेदार जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
आई आणि मायलेक दोघेही घाबरले आणि तिथून पळून गेले मात्र ते पोलिसांच्या हाती लागले. महिला नागपूर मध्यवर्ती तुरुंगात आहे. तर मुलगा अल्पवयीन गुन्हेगारांसाठी असलेल्या बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. आता मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला देखील तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी या नराधमावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलींना पुनर्वसन आणि समुपदेशनासाठी सरकारी निवारागृहात पाठवण्यात आले आहे.
Ans: 14 वर्षीय भावाने घरातून पळून जाऊन शेजाऱ्याला सांगितले. त्यानंतर तृतीयपंथीयांनी मुलींना वाचवले.
Ans: आरोपी मुलींचा स्वतःचा बाप असून त्याला ताबडतोब अटक करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला.
Ans: मुलींना सरकारी निवारागृहात ठेवून समुपदेशन व पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे.