Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime News: नागपुरात साताऱ्याची पुनरावृत्ती; पोलिसाकडून २३ वर्षीय तरुणीवर लैंगिक छळ

नागपूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यावर २३ वर्षीय तरुणीने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणानंतर नागपूर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 28, 2025 | 10:25 AM
Nagpur Crime

Nagpur Crime

Follow Us
Close
Follow Us:
  • सातारा महिला डॉक्टरची आत्महत्या
  • नागपुरात पोलिस कर्मचाऱ्याकडून २३ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
  • पोलिस कर्मचारी उमेश शेळके फरार

Nagpur Crime News: साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरवर पोलिस अधिकाऱ्याकडून झालेल्या अत्याचार आणि मानसिक छळाच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या महिला डॉक्टरने फलटणमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी तिने आपल्या हातावर पीएसआय बदने याचे नाव लिहिले होते. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

ही घटना ताजी असतानाच ता नागपुरातही पोलिसांवर अशाच प्रकारचा आरोप करण्यात आला असून, खाकीवर पुन्हा एकदा डाग लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. या तक्रारीमुळे नागपूरमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.साताऱ्यातील महिला डॉक्टरवरील पोलीस अधिकाऱ्याच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरू असतानाच, आता उपराजधानी नागपूरातही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यावर २३ वर्षीय तरुणीने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणानंतर नागपूर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Noida Crime: नोएडामधील आलिशान सोसायटीत संशयास्पद मृत्यू! ‘गे डेटिंग ॲप’वरील पार्टीदरम्यान ८व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोप करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव उमेश शेळके असे आहे. उमेश शेळके यांने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणाची चौकशी नागपूर पोलिसांकडून सुरू असून, या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याचा सखोल तपास करण्यात येत आहे. उमेश शेळके या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात २३ वर्षीय तरुणीने नागपूरमधील कपिल नगर पोलीस स्टेशनमध्ये तीन आठवड्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत उमेश शेळके याने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Pune Crime : पुण्यात मोठी फसवणूक! प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांकडून व्यावसायिकाला ३७ लाखांचा गंडा

पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, गुन्हा दाखल होऊन तीन आठवडे उलटून गेले तरीही पोलिसांकडून आरोपीविरुद्ध ठोस कारवाई झालेली नाही. उलट, पोलिसांकडून “उमेश शेळके फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे,” एवढेच उत्तर मिळत असल्याचे तरुणीने सांगितले. या प्रकरणामुळे नागपूर पोलीस दलावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Web Title: Nagpur crime news satara incident repeated in nagpur 23 year old girl sexually harassed by police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 10:25 AM

Topics:  

  • Nagpur Crime
  • Nagpur Crime News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.