उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री एक अत्यंत संशयास्पद मृतदेह सेक्टर -७४ येथील आलिशान सुपरटेक नॉर्थ आय सोसायटीत आढळून आला आहे. तो मृतदेह २९ वर्षीय तरुणाचा असल्याचे समोर आलं आहे. त्याच आठव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. ही घटना अपघात आहे की हत्या याचा तपास पोलीस करत आहे.
कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; अवघ्या पाच दिवसांत ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
गे डेटिंग ॲपच्या पार्टीत घडला प्रकार
समोर आलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव शुभम कुमार असे आहे. शुभम कुमार २५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी आपल्या काही मित्रांसोबत पार्टीत करण्यासाठी सोसायटीतील एका फ्लॅटवर आला होता. हे सर्व तरुण एका ऑनलाईन समलैंगिक डेटिंग ॲपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले होते. या ॲपशी जोडलेले सुमारे ७ ते ८ तरुण या फ्लॅटमध्ये पार्टीसाठी जमा झाले होते. रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू होती आणि २६ ऑक्टोबरच्या पहाटे शुभम कुमार बाल्कनीतून खाली पडला, ज्यामुळे जागीच त्याचा मृत्यू झाला.
दोन जण ताब्यात
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. एडीसीपी नोएडा सुमित शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी दोन लोकांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु केली आहे. कायदेशीर कार्यवाही केली जात असून घटनास्थळी शांतता राखण्यात आली आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती?
पोलिसांनी सांगितले की, मृत शुभमच्या कुटुंबीयांनी सूचित करण्यात आले आहे. शुभम खाली कसा पडला, हे अपघाताने घडले की हत्या आहे? याचा तपास केला जात आहे. पोलीस घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, रिपोर्टची प्रतीक्षा आहे. उच्चभ्रू सोसायटीतील या संशयास्पद मृत्यूने नोएडा शहरात खळबळ माजली आहे.
सोन्याचा संसार झाला उद्ध्वस्त; बायकोच्या अफेअरचा धक्का सहन न झाल्याने पतीने संपवलं आयुष्य
उत्तर प्रदेशातील बरेली या ठिकाणी धक्कादायक घटनेने सगळे हळहळ व्यक्त करत आहेत. एका वकिलाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आत्महत्येच कारण स्वतःचीच बायको ठरली आहे. झाल अस की, बायकोचे एका मुलावर प्रेम झाल आणि त्यांचे प्रेमसंबंध घरी समजले होते. अनेकदा बायकोला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तिने काही ऐकल नाही. सोन्याचा संसार सुरू असताना तिने प्रेम संबंध ठेवले. घरात पदरात दोन मुलं आहेत तू अस काही करू नकोस असे घरचे सातत्याने सांगत होते. मात्र तिने ऐकल नाही त्याचा धक्का नवऱ्याला सहन झाला नाही आणि त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.
‘मेरे अब्बू को किसने मारा’ म्हणत तरुणाचा राडा; दोघांवर केला चाकूने हल्ला






