Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Group Attack: तरुणावर लोखंडी फायटर अन् दगडांनी टोळीचा जीवघेणा हल्ला; संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद!

Group Attack: खाकीच्या आडोशाने उघड उघड गुंडगिरी? येरवड्यात पहाटे तरुणाचे रक्त सांडले, फायटर अन् दगडांनी डोके फोडले... पण पोलिसांनी तक्रारदारावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप! पाहा सीसीटीव्हीतील अंगावर काटा आणणारा थरार!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 11, 2026 | 03:55 PM
Group Attack: तरुणावर लोखंडी फायटर अन् दगडांनी टोळीचा जीवघेणा हल्ला; संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद!

Group Attack: तरुणावर लोखंडी फायटर अन् दगडांनी टोळीचा जीवघेणा हल्ला; संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद!

Follow Us
Follow Us:
  • टोळीने लोखंडी फायटर व दगडांनी केला हल्ला
  • हल्ल्यात डोक्याला ६ टाके पडले; सीसीटीव्हीत थरार कैद
  • आरोपी पोलीस दलातील असल्याने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप
Group Attack: पुणे शहरातील येरवडा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एका तरुणावर ८ ते १० जणांच्या टोळीने लोखंडी फायटर आणि दगडांनी सामूहिक जीवघेणा हल्ला चढवला. या भयंकर मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, या संपूर्ण थराराचे व्हिडिओ चित्रीकरण परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

हेही वाचा:  Bus Accident: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळच काळाचा घाला! भीषण बस अपघाताने प्रशासनात खळबळ; प्रत्यक्षदर्शींनी सांगितल…

८ ते १० जणांच्या टोळीचा जीवघेणा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या वेळी सूरज कांबळे (वय २५) हा तरुण आपल्या मित्रांसोबत परिसरात असताना ८ ते १० जणांच्या टोळीने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी लोखंडी फायटर आणि दगडांचा वापर करत अत्यंत निर्घृणपणे मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सूरजसोबत असलेल्या इतर तरुणांनीही समोरील टोळीवर पलटवार करत बचाव करण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपींच्या टोळीने केलेल्या भीषण हल्ल्यात सूरज कांबळे गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांना तब्बल ६ टाके घालावे लागले आहेत.

खाकीच्या दबावाखाली तक्रारदारावरच गुन्हा?

या जीवघेण्या हल्ल्यानंतर येरवडा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र, या प्रकरणाला आता एक वेगळेच वळण मिळाले आहे. मुख्य आरोपीची आई आणि चुलती पुणे पोलीस दलातच कार्यरत असल्याचा खळबळजनक दावा तक्रारदार सूरज कांबळे याने केला आहे. पोलीस नातेवाईकांच्या राजकीय व प्रशासकीय दबावाखाली येऊन पोलिसांनी उलट आपल्यावरच खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप सूरजने केला आहे.

हेही वाचा: Navi Mumbai: नाकाबंदीत गाडी थांबवणे पडले महागात! कार चालकाने पोलिसाला उडवले अन् बोनेटवर अडकवून भररस्त्यात नेले फरफटत!

पोलीस आयुक्तांकडे न्यायासाठी धाव

पोलीस ठाण्यात योग्य न्याय मिळत नसल्याचा आरोप करत पीडित सूरज कांबळे याने थेट पुणे पोलीस आयुक्तांचे दार ठोठावले आहे. मारहाणीचे स्पष्ट सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) आणि वैद्यकीय कागदपत्रांच्या (Medical Documents) पुराव्यांसह त्याने पोलीस आयुक्तांकडे अधिकृत तक्रार सादर केली आहे. या प्रकरणात पोलिसांचा कोणताही राजकीय किंवा अंतर्गत दबाव न आणता निष्पक्ष तपास व्हावा, आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी आणि स्वतःच्या जिवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, अशी आक्रमक मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: येरवड्यात मारहाणीची ही घटना कधी आणि कुठे घडली?

    Ans: येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

  • Que: या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव काय आहे आणि त्याला किती दुखापत झाली आहे?

    Ans: जखमी तरुणाचे नाव सूरज कांबळे (वय २५) असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ६ टाके पडले आहेत.

  • Que: तक्रारदाराने पोलिसांवर कोणता गंभीर आरोप केला आहे?

    Ans: मुख्य आरोपीचे नातेवाईक पोलीस दलात असल्याने त्यांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी तक्रारदारावरच खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Web Title: Pune yerwada group attack cctv police sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Attack
  • CCTV
  • Crime . Crime News
  • Latest pune news update

संबंधित बातम्या

Navi Mumbai: नाकाबंदीत गाडी थांबवणे पडले महागात! कार चालकाने पोलिसाला उडवले अन् बोनेटवर अडकवून भररस्त्यात नेले फरफटत!
1

Navi Mumbai: नाकाबंदीत गाडी थांबवणे पडले महागात! कार चालकाने पोलिसाला उडवले अन् बोनेटवर अडकवून भररस्त्यात नेले फरफटत!

Attack News: “गाडीला कट मारला म्हणून थेट हातच उडवले!” अल्पवयीन गुंडांचा भयंकर कोयता हल्ला; तरुणाच्या शरीरावर ७०० टाके अन्..
2

Attack News: “गाडीला कट मारला म्हणून थेट हातच उडवले!” अल्पवयीन गुंडांचा भयंकर कोयता हल्ला; तरुणाच्या शरीरावर ७०० टाके अन्..

Bus Driver Attacked : “हाता पाया पडूनही गुंड थांबले नाहीत!” चाकणमध्ये भररस्त्यात एसटी बस अडवून चालकाला बेदम मारहाण अन्…
3

Bus Driver Attacked : “हाता पाया पडूनही गुंड थांबले नाहीत!” चाकणमध्ये भररस्त्यात एसटी बस अडवून चालकाला बेदम मारहाण अन्…

Crime News: “शाखाप्रमुख पद मिळवून दिलं म्हणून थेट खल्लास?” मध्यरात्री थरार; नगरसेवकाच्या पुतण्याने पाठीत खुपसला चाकू!
4

Crime News: “शाखाप्रमुख पद मिळवून दिलं म्हणून थेट खल्लास?” मध्यरात्री थरार; नगरसेवकाच्या पुतण्याने पाठीत खुपसला चाकू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.