सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चिंतामणीनगरमधील चिंतामणी भाजी मंडई परिसरात हा थरार घडला. आकाश लक्ष्मण कोठावळे (वय २९, रा. गाडीतळ, हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्या सुरक्षक्षकाचे नाव आहे. आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने आकाशचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर कोयत्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळलेल्या आकाशाला तेथील स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या संपूर्ण हल्ल्याचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सुरक्षक्षकावर हल्ला केल्यानंतर तिथून पसार होत असतानाही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी जेएसपीएम कॉलेजच्या शेजारील आदर्शनगर परिसरातील रस्त्यावर उभ्या केलेल्या १० कार आणि १ बसची कोयत्याने तोडफोड करत गाड्यांचे मोठे नुकसान केले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जखमी आकाशचे वडील लक्ष्मण बाबुराव कोठावळे (वय ५७) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून, तत्परता दाखवत हल्ला करणाऱ्यांपैकी अंजू उर्फ महमंद हुसेन शब्बीर शेख आणि अविनाश सतीश केकाणे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील करत आहेत.
Ans: पुण्याच्या हडपसर भागातील हांडेवाडी रस्त्यावरील चिंतामणीनगर परिसरात ही घटना घडली.
Ans: सुरक्षक्षकावर हल्ला केल्यानंतर पळून जाताना आरोपींनी १० कार आणि १ बस अशा एकूण ११ वाहनांची तोडफोड केली.
Ans: पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघा आरोपींना (अंजू उर्फ महमंद हुसेन शब्बीर शेख आणि अविनाश सतीश केकाणे) अटक केली आहे.






