
Navi Mumbai: नाकाबंदीत गाडी थांबवणे पडले महागात! कार चालकाने पोलिसाला उडवले अन् बोनेटवर अडकवून भररस्त्यात नेले फरफटत!
समोर आलेल्या माहितीनुसार, कळंबोली परिसरात पोलीस पथक नेहमीप्रमाणे नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करत होते. दरम्यान, एक संशयित भरधाव स्विफ्ट डिझायर गाडी त्या रस्त्याने आली. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, खाकीचा कोणताही धाक न बाळगता चालकाने थेट समोर उभ्या असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई यांचे म्हणणे न ऐकता कार पुढे ढकलली. कार चालक न थांबल्याने कॉन्स्टेबल भोई हे कारच्या बोनेटवर फेकले गेले.
तरीही याची पर्वा न करता नराधम चालकाने कार वेगाने पुढे नेत भोई यांना बोनेटवर अडकलेल्या स्थितीतच तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत नेले आणि नंतर तिथून पळ काढला. या भयानक अपघातात पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना सहकाऱ्यांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
पोलीस नाकाबंदीला चकवा देऊन पसार झालेल्या या कारचा प्राथमिक तपास केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्विफ्ट डिझायर गाडीवर लावलेली नंबर प्लेट पूर्णपणे बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहे. गाडीत दोन व्यक्ती बसल्या होत्या. सध्या कळंबोली पोलीस ठाण्यात या अज्ञात आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या मदतीने फरार कार आणि आरोपींचा कसून शोध सुरू आहे. बनावट नंबर प्लेट लावण्याचे नेमके कारण काय, कार चालवणारे सराईत गुन्हेगार होते का, किंवा ही कार अन्य कोणत्या गुन्ह्यात वापरली होती का, अशा विविध मुद्द्यांवर पोलीस सखोल तपास करत आहेत.
Ans: नवी मुंबईतील गजबजलेल्या कळंबोली परिसरात ही घटना घडली आहे.
Ans: नाकाबंदीदरम्यान थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने कार न थांबवता पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई यांना बोनेटवर घेत तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत नेले.
Ans: कारवर लावलेली नंबर प्लेट पूर्णपणे बनावट असल्याचे तपासात उघड झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.