
Nagpur News:
पीडितांकडून वाहन बुकिंग, गुंतवणूक व इतर व्यवहारांमध्ये मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन डीसीपी मदने यांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्याचे आदेश संबंधित पोलिसांना दिले. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून आणखी पीडित समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस अधिक तपास करत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Malegaon Protest: मालेगाव अत्याचार प्रकरणात आंदोलक संतप्त, थेट कोर्टात शिरून…; पोलिसांचा लाठीचार्ज
पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच मोटर्सने ग्राहकांना ७० टक्के डाउन पेमेंट व शून्य टक्के व्याजाने वाहन मिळेल असे आमिष दाखवले. या आश्वासनांवर विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी लाखो रुपयांचा भरणा केला. मात्र प्रत्यक्षात कंपनीने ग्राहकांकडून मोठी रक्कम घेतल्यानंतर १००% वाहन फायनान्स ग्राहकांच्या नावावरच करून घेतले, ज्यामुळे वाहन खरेदी करणाऱ्यांवर अपेक्षेपेक्षा दुप्पट हप्त्यांचा आर्थिक बोजा येऊन पडला. पैसे घेतल्यानंतरही कंपनीने वाहनांची कागदपत्रे, फायनान्स प्रक्रिया किंवा कर्जाच्या अटींबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही, असा आरोप पीडितांनी केला आहे. त्यामुळे फसवणुकीची ही पद्धत मोठ्या प्रमाणावर राबवली गेल्याचे स्पष्ट होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तक्रारींची गंभीरता लक्षात घेत डीसीपी राहुल मदने यांनी पीडितांचे निवेदन ऐकल्यानंतर तात्काळ लकडगंज पोलिस ठाण्याच्या पीआयला चौकशीचे आदेश दिले. निर्देश मिळताच पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू केला. अल्पावधीतच एमएच मोटर्सविरुद्ध दोन गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींवर आयएनएस कलम 318(4), 316(2), 3(5) अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पीडितांना दिलासा मिळाला असून पुढील तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पीडितांचे आर्थिक नुकसान आणखी वाढू नये म्हणून डीसीपी राहुल मदने यांनी तातडीने आरोपींची सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता आरोपी कोणताही आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत. या कारवाईमुळे मोठ्या दडपणाखाली असलेल्या पीडितांना दिलासा मिळाला आहे. लकडगंज पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनीही पीडितांना आश्वासन दिले आहे की, कायद्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना ईएमआय भरण्याची गरज नाही. त्यामुळे दुप्पट हप्त्यांच्या कचाट्यात अडकलेल्या नागरिकांना मोठा श्वास मिळाला आहे.
या संपूर्ण प्रकरणात वसीम खान यांनी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. डीसीपींनी तत्काळ केलेल्या कठोर कारवाईचे स्वागत करताना खान म्हणाले, “अशा फसवणूक करणाऱ्यांना नागपूरमध्ये जागा नाही. पीडितांचा आवाज आम्ही थांबू देणार नाही.”
एमएच मोटर्स फसवणूक प्रकरणामुळे नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढील चौकशी आणि कारवाईला आता गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.