मालेगाव अत्याचार प्रकरण (फोटो- सोशल मिडिया)
मालेगाव अत्याचार प्रकरणी राज्यभरात संताप
आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
Malegaon Crime News: मालेगाव अत्याचार प्रकरणात राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव प्रकरणात एका चिमूरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज आंदोलकांनी थेट कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे चिमुरडीवर अत्याचार करून त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. आज त्याला पोलिसांनी कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाच्या बाहेर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. आंदोलक संतप्त झाल्याचे दिसून आले. |
या आरोपीला कोर्टात हजर केले असता, बाहेर आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला. कोर्टाच्या आवारात शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज केल्याचे समजते आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
मालेगाव अत्याचार प्रकरणी या मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप
नाशिक मध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात असल्याचे समोर आले आहे. या घटनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी लोक करत आहेत. तसेच शवविच्छेदन अहवालात चिमुकलीवर अत्याचार झाल्याचं तसेच डोक्यात वर्मी घाव बसल्याने तिचा मृत्यू झाल्याचं नमूद केले गेले आहे. या घटनेबाबत आता अनेक मराठी सेलिब्रेटी आपला संताप व्यक्त करत आहेत. आता अश्यातच मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव हिने व्हिडीओ शेअर करत आपले मत मांडले आहे.
रुचिरा म्हणाली, “सोशल मीडियावर जे काही मी पाहतेय. ज्या काही बातम्या, व्हिडीओ येत आहेत… मालेगावमध्ये जे काही घडलंय, त्याबद्दल मी बोलतेय. ४ वर्षांची मुलगी… या गोष्टीचं जोपर्यंत आपण मूळ शोधत नाही आणि त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन आपण काहीच करणार नाही तोपर्यंत हे होत राहणार… आता आपण या घटनेबद्दल वाचणार, प्रतिक्रिया देणार… हळहळ व्यक्त करणार… बापरे! पण, पुढे काहीच नाही होणार उद्यापासून मी माझ्या कामाला लागणार, तुम्ही तुमचं काम करणार. या गोष्टीचं मूळ जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. जर या मुलीला न्याय मिळाल नाही तर एक समाज म्हणून आपण नापास आहोत.”






