Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Violence News : 200-300 चा मॉब, दगडफेक अन्…; नागपुरात काल रात्री नेमकं काय घडलं?

या घटनेत एक क्रेन, आणि अनेक दुचाक्याही जाळण्यात आल्या. या संपूर्ण घटनेत 33 पोलीस जखमी झाले आहेत. यात ३ उपायुक्त दर्जाच्या पोलिस गंभीर जखमी झालेत. यातील एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 18, 2025 | 02:12 PM
Nagpur Violence News : 200-300 चा मॉब, दगडफेक अन्…; नागपुरात काल रात्री नेमकं काय घडलं?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  “विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांच्या वतीने काल (17 मार्च) नागपुरात औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलकांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरही जाळली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हाही दाखल कऱण्यात आला. पण दुपारच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली, तिच्यावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा रात्रीपर्यंत  पसरवण्यात आली. त्यानंतर रात्री 8च्या  दरम्यान 200-250 चा जमाव जमला आणि आग लावून टाकू अशाी घोषणाबाजी सुरू केली. त्याचवेळी पोलिसांनी मध्यस्थी करत बळाचा वापर करावा लागला.” अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  नागपुरात झालेल्या दंगलीची माहिती दिली.

विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,” यापूर्वी बजरंग दलाची तक्रार द्यायची आहे असं काहींनी सांगितल. त्या आंदोलकांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि तिथे त्यांची तक्रारही लिहून घेण्यात आली. एकीकडे पोलिसांची  कारवाई सुरू असताना, दुसरीकडे 200-300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले, त्यांच्या तोंड कपड्यांनी झाकले होते.  यात अनेक दुचाक्यांचेही नुकसान झाले, अनेक जण गंभीर जखमीही झाले.”

Eknath Shinde on Nagpur Violence: एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं गेलं; नागपूर हिंसाचाराबाबत एकनाथ शिंदेंना संताप अनावर

जमावाकडून पोलिसांवर हल्ले

दुसऱ्या घटनेत, भालदारपुरा भागात 80-100 जणांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना अश्रुधूर आणि सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत एक क्रेन, आणि अनेक दुचाक्याही जाळण्यात आल्या. या संपूर्ण घटनेत 33 पोलीस जखमी झाले आहेत. यात ३ उपायुक्त दर्जाच्या पोलिस गंभीर जखमी झालेत. यातील एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. पाच नागरिक जखमी झाले आहेत. या प्रकऱणात गणेशपेठ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल कऱण्यात आले आहे. तहसील  पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू कऱण्यात आली आहे.सात ते आठ भागातील प्रवेशाच्या ठिकाणी  नाकाबंदी कऱण्यात आली आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्याच्या महासंचालकांनी सर्व सीपी आणि एसपी यांच्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत.

ट्रॉली भरून दगड

सगळ्यात सकाळची घटना घडल्यानंतर संध्याकाळच्या वेळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केला. दगडफेकीच्या ठिकाणी जवळपास एक मोठी ट्रॉली भरून दगड मिळाले आहेत. काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगडही  अनेक ठिकाणी आढळून आले. अनेक ठिकाणी शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अगदी ठरवून, काही ठराविक घरांना, कार्यालयांना लक्ष्य कऱम्यात आले आहे. तीन डीसीपींवर हल्ला करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारात काही लोकांचा सुनियोजित कट असल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांवर कारवाई केली जाईल. कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना सोडणार नाही. पोलिसांवरचा हल्ला सहन करणार नाही.  महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखण ही आपली जबाबदारी आहे. सर्व समाजाचे धार्मिक सण सुरू आहेत. त्यामुळे कोणीही संयम सोडू नये. अशी विनंतीही देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

पुण्यातील लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला आणि सगळं उघड झालं

Web Title: Nagpur violence what exactly happened in nagpur last night fadnavis told everything in the house nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur
  • Nagpur Violence

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
2

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
3

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
4

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.