Phoot Credit- Social Media नागपुरात झालेल्या हिंसाचाराबाबत एकनाथ शिंदेंनी सभागृहात माहिती दिली
मुंबई: “छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण योग्य आहे का, असा माझा सवाल आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे. औरंगजेबाने आपली मंदिरे पाडली, आपल्या आया बहिणींची अब्रु लुटली, शंभुराजे सापडत नव्हते तर निष्पाप लोकांचे बळी घेतले. लाखो लोकांच्या रक्ताचे पाट वाहिले, हा इतिहास असताना औरंगजेबाचं उदात्तीकरण योग्य नाही. आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. एक सच्चा देशभक्त मुसलमानपण या औरंगजेबाचं उदात्तीकरण करणार नाही. ” असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आपला संताप व्यक्त केला.
राज्याची उपराजधानीत काल (17 मार्च) झालेल्या हिंसाचारामुळे राजकीय वातावरणही चांगलचं तापलं आहे. औरंगजेबाच्या कबरच्या वादावरुन नागपूरमध्ये दंगल झाली. नागपुरातील महाल परिसर, हंसपुरी, मोमीनपुरा या भागासह आसपासच्या परिसरात मोठ्या जमावाने दगडफेक आणि जाळपोळ केली. वाहनांची तोडफोड तसेच पोलीस दलावर देखील दगडफेक केली. जेसीबी जाळण्यात आला. यामुळे नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले असून नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागांतील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली. नागपुरात झालेल्या या हिंसाचाराबाबात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ काल नागपुरात औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी दोन समाजात मध्यस्थी करत शांतता प्रस्थापित केली. पण रात्री आठ वाजताच दोन-चार हजार लोकांचा मॉब जमला. नागपुरातील महाल परिसर, हंसपुरी, मोमीनपुरा भागात दगडफेक, जाळपोळ झाली. मी व्हिडीओ, फोटो पाहिले, महिलांचा आक्रोश पाहिला, हिंसकांनी घरांवर मोठमोठे दगड टाकले,हॉस्पीटलची तोडफोड केली, तिथल्या देवांचे फोटो जाळून टाकले. तुम्ही आंदोलनाचे प्रत्युत्तर आंदोलनानेच द्या, आंदोलने करा, तुम्ही कायदा हातात घेणार, एका विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं.”
काल संध्याकाळी झालेल्या हल्ल्यात तीन डिसीपींवर गंभीर हल्ले झाले. हिंसा करणाऱ्यांकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले, गाड्या जाळल्या गेल्या, एका विशिष्ट ठिकाणी 100-150 बाईक पार्क केल्या जायच्या, काल त्या ठिकाणीही एकही गाडी पार्क नव्हती. याचा अर्थ कायजाणीव पूर्वक हा कट रचला होता. एका विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्यातं आलं. लोकजीव मुठीत धरून होते. पोलीस येईपर्यंत अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. पोलिसांवरही हल्ले करण्यात आले. त्यांच्यावरही, कुऱ्हाडी आणि हत्यारांनी वार करण्यात आले.
‘नरेंद्र मोदी पूर्वीजन्मीचे शिवाजी महाराज…’; भाजप खासदाराच्या विधानाने नव्या वादाची ठिणगी