
crime (फोटो सौजन्य: social media)
Govind Pansare: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड याचा हृदयविकाराने मृत्यू
टेकाडी येथील रहिवासी प्रमोद नत्थूजी बोराडे (४५) हे गत ८ वर्षापासून सदर कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होते. कंपनीत आवश्यक सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, रात्री उशिरा काम सुरू असताना अचानक एक जड़ लोखंडी प्लेट त्यांच्या पोटावर कोसळली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर मृतकाच्या नातेवाइकांनी कंपनीकडे उपचार खर्च व नुकसानभरपाईची मागणी केली, मात्र कंपनी व्यवस्थापनाने जबाबदारी स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला.
याचदरम्यान, कंपनी मालकाने दूरध्वनीवरून, ‘त्याला मरायचेच होते, म्हणून तो आमच्या कंपनीत आला’ असे अमानवी विधान केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या विधानामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी मृतदेह थेट कंपनी गेटसमोर आणून आंदोलन छेडले. आंदोलनात नातेवाईक, सहकारी कामगार तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सुरक्षा व पायाभूत सुविधांचा अभाव
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, कंपनीत सेफ्टी किट, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच आपात्कालीन वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे कामगारांचे जीव धोक्यात घातले जात आहेत. मृत प्रमोद बोराडे यांच्या पश्चात पत्नी व एक अल्पवयीन मुलगी असून कुटुंबावर उपजीविकेचे गंभीर संकट ओढावले आहे. दोषींवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, कंपनी सील करावी तसेच पीडित कुटुंबाला ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी आंदोलनकत्यांनी केली.
रुग्णालयातही तणावपूर्ण वातावरण
दरम्यान,कामठी उपजिल्हा रुग्णालयातही तणावपूर्ण वातावरण झाले होते. नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने कंपनी अधिकारी व नातेवाइकांमध्ये वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कंपनी परिसर तसेच रुग्णालयात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
Ans: प्रमोद नत्थूजी बोराडे (वय 45), टेकाडी येथील रहिवासी व 8 वर्षांपासून कंपनीत कार्यरत.
Ans: काम करत असताना जड लोखंडी प्लेट पोटावर कोसळून गंभीर जखमी झाले; उपचारादरम्यान मृत्यू.
Ans: दोषींवर गुन्हा दाखल करणे, कंपनी सील करणे व 50 लाखांची नुकसानभरपाई.