Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NAGPUR NEWS: नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची पुण्यात बदली; विपीन इटनकर प्रभारी

नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची पुण्यात बदली. निवडणुकीनंतर प्रशासक कार्यकाळ संपताच निर्णय, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे प्रभारी आयुक्तपदाची सूत्रे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 05, 2026 | 03:26 PM
NAGPUR (फोटो सौजन्य: social media)

NAGPUR (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • जुलै 2023 पासून प्रशासक म्हणून कार्यकाळ
  • कार्यपद्धतीवर राजकीय वर्तुळात नाराजी
  • पुणे महानगर विकास प्राधिकरणात नवी नियुक्ती
नागपूर : महापालिका निवडणुकीनंतर पदाधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारताच प्रदीर्घ काळ प्रशासक राहिलेले महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची पुण्यात बदली करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना प्रभारी आयुक्तपदाची सूत्रे सोपविली जाणार आहे.डॉ. अभिजित चौधरी यांची ४ जुलै २०२३ मध्ये नागपूरला बदली झाली. ओबीसी आरक्षणामुळे महापालिका निवडणूक लांबल्याने त्यांचा पूर्ण कार्यकाळ प्रशासक म्हणूनच राहिला. निवडणुकीनंतर फेब्रुवारीत प्रशासक म्हणून कार्यकाळ संपताच चौधरी यांची बदली झाली.

Nagpur: नागपूरच्या हिंगणात चोरांचा धुमाकूळ; ५ बंगल्यांची घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

प्रशासकीय कामात त्यांनी बऱ्यापैकी सुधारणा केल्याचे बोलले जात असले तरी, लोकांचे प्रश्न सोडविण्यात फारसे प्रभावी नव्हते, असा सूर राजकीय वर्तुळात होता. चौधरी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत शहरातील बड्‌या नेत्यांनी बरेचदा त्यांच्या बदलीची मागणी केली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, काँग्रेस शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, भाजप आ. प्रवीण दटके यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे व दटके यांनी कचरा संकलनाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून आयुक्तांना घेरले होते. गडकरींनी महापालिकेत जनता दरबार घेऊन प्रशासनाला खडेबोल सुनावले होते. या सर्व पार्श्वभूमीवर चौधरी यांची सुमारे पावणेतीन वर्षांनंतर बदली करण्यात आली.

नवे आयुक्त कोण ? चर्चेला उधाण
अभिजित चौधरी यांची पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांकडे सूत्रे सोपवून नवीन पदभार लगेच स्वीकारण्याची सूचना बदली आदेशात केली. महापालिकेचे नवे आयुक्त कोण असतील, याची उत्सुकता पदाधिकारी, नगरसेवकांसह अन्य अधिकारी-कर्मचारी व राजकीय चळवळीतील कार्यकत्यांना लागली असली तरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात येत असल्याने तेच नवे आयुक्त राहतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ तापला; तापमानाचा पारा गेला 40 अंशांवर

💡

Frequently Asked Questions

  • Que: बदली कुठे करण्यात आली?

    Ans: पुणे येथे, पुणे महानगर विकास प्राधिकरणात.

  • Que: प्रभारी आयुक्तपद कोणाकडे?

    Ans: जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे.

  • Que: बदलीची पार्श्वभूमी काय?

    Ans: निवडणुकीनंतर प्रशासक कार्यकाळ समाप्त; कार्यपद्धतीवर टीका.

Web Title: Nagpur municipal corporation commissioner dr abhijit chaudhary transferred to pune vipin itankar in charge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Nagpur

संबंधित बातम्या

Nagpur Crime: ‘गुलाबजाम’वरून वाद अन् तरुणाची हत्या; नागपुरात मित्राने चाकू भोसकून केला प्राणघातक हल्ला
1

Nagpur Crime: ‘गुलाबजाम’वरून वाद अन् तरुणाची हत्या; नागपुरात मित्राने चाकू भोसकून केला प्राणघातक हल्ला

Nagpur Crime: नागपुरात वासनांध विकृतीचा कळस! मुलानेच केला सावत्र आईवर अत्याचार
2

Nagpur Crime: नागपुरात वासनांध विकृतीचा कळस! मुलानेच केला सावत्र आईवर अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.