काय नेमकं प्रकरण?
राहुल बरखू राय (रा. मुकुंदवाडी) हे कुटुंबासह मुकुंदवाडी येथे राहत होता. आरोपी भोलकुमार देखील त्यांच्यासोबत राहात होता. या घटनेतील मृत तरुणीसोबत भोलाचे प्रेमसंबंद होते. मात्र तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा भोलाला संशय होता. याच संशयावरून भोलाचे आणि त्याच्या प्रेयसीचे वारंवारं वाद होत होते. एका वादात भोलाणे तरुणीचा मोबाईल जाळून टाकला होता.
हे प्रकरण राहुलच्या मोठा भाऊ सुनीलला लक्षात येताच सुनीलने भोलाला घर सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर भोळा स्वराजनगर येथे राहायला गेला. प्रेयसीने आपल्याला सोडल्याचा राग भोलाच्या मनात होता. याच रागातून त्याने प्रेयसीची हत्या करण्याचा कट रचला. त्याने ८ नोव्हेंबरला सायंकाळी प्रेयसीला मारहाण केली आणि तिचा ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. हत्या केल्यानंतर मृतदेह गुंडाळून तो जवळच्या मैदानात आणून टाकण्यात आला.
आरोपी स्वतः गेला शोधायला
एवढेच नाही तर महिला घरी परतली नाही म्हणून भोला स्वतः राहुलसोबत तिचा शोध घेत फिरत होता. मात्र ती कुठे सापडली नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे दूध घेऊन जात असलेल्या एका महिलेला मैदानात मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करत भोलाला अटक केली.
न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा
पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान सहायक सरकारी लोकअभियोक्ता अरविंद बागूल यांनी एकूण 11 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यापैकी 3 साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. सर्व पुरावे व साक्षी तपासल्यानंतर न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी सोमवारी भादंवि कलम 302 अन्वये आरोपी भोलाकुमार याला जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त तीन महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मालेगाव-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; पिकअप-ट्रॅव्हल्सच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू
Ans: छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरात.
Ans: प्रेयसीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय आणि नातं तुटल्याचा राग.
Ans: आरोपीला जन्मठेप आणि 10 हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षा.






