काय घडलं नेमकं?
रानोजी हा नांदेड येथील बी. एस्सी. प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. राणोजीचे आई-वडील रोजगारासाठी तेलंगणा राज्यात गेली होती. काही दिवसांपूर्वी कामानिमित्त तो गावी आला होता. बुधवारी सकाळी रानोजीने आपल्या भावाला नांदेडला परत जायचे असल्याचे सांगितले. तेव्हा भावाने त्याला इस्लापूर येथे सोडले. मात्र, तो नांदेडला न जाता पुन्हा सहस्त्रकुंड परिसरात परतला. त्यानंतर दुपारच्या सुमारास सहस्त्रकुंड येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास लावून त्याने आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती.
काय लिहिले होते पोस्टमध्ये
रानोजीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने आई- वडिलांची आठवण व्यक्त करताना लिहिले होते, “आई, बाबा आज तुमची खूप आठवण येत आहे. मी घरी आहे, पण तुम्ही इथे नाही. लवकर या… मी वाट बघतोय.” अशी पोस्ट शेअर केली. त्यानंतर सुमारे दोन तासात त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.
आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. आत्महत्या कारण्यामागेचे नेमके कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे. त्याच्या जवळून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून तो मानसिक तणावात होता का, याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
Beed News: बीड जिल्ह्यात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीने संपवलं जीवन, गावात शोककळा
Ans: रानोजी विलास ऐनवलेवाड (वय 20), बी.एस्सी. प्रथम वर्षाचा विद्यार्थी.
Ans: होय, त्याने इंस्टाग्रामवर आई-वडिलांची आठवण व्यक्त करणारी भावनिक पोस्ट शेअर केली होती.
Ans: अद्याप स्पष्ट नाही; मात्र आई-वडिलांची ओढ आणि मानसिक तणाव कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.






